अडकूरमध्ये १०९ रुग्णांची तपासणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अडकूरमध्ये १०९ रुग्णांची तपासणी
अडकूरमध्ये १०९ रुग्णांची तपासणी

अडकूरमध्ये १०९ रुग्णांची तपासणी

sakal_logo
By

32405
अडकूर : देसाई हॉस्पिटल, ग्रामपंचायत, अष्टविनायक गणेशोत्सव मंडळातर्फे झालेल्या शिबिरात रुग्णांची तपासणी करताना डॉ. चंद्रशेखर देसाई, डॉ. रोहित देसाई.

अडकूरमध्ये १०९ रुग्णांची तपासणी
गडहिंग्लज : येथील देसाई हॉस्पिटल, अडकूर ग्रामपंचायत व अष्टविनायक गणेशोत्सव मंडळातर्फे अडकूर (ता. चंदगड) येथे मूत्ररोग व हृदयरोग तपासणी शिबिर झाले. ग्रामपंचायतीच्या सभागृहात झालेल्या या शिबिरात १०९ रुग्णांची तपासणी करण्यात आली. हृदयरोगतज्ज्ञ डॉ. चंद्रशेखर देसाई, डॉ. रोहित देसाई, डॉ. अभिजित मुसळे यांनी रुग्णांची तपासणी करून मार्गदर्शन केले. डॉ. रणधीर देसाई, डॉ. जी. आर. देसाई, डॉ. बी. आर. पाटील, डॉ. आनंदा गोरंबेकर यांचे सहकार्य मिळाले. पंचायत समितीचे माजी सभापती बबन देसाई, सरपंच यशोदा कांबळे, बाजार समिती प्रशासकीय मंडळाचे माजी अध्यक्ष अभय देसाई, बबन देसाई, अष्टविनायक मंडळाचे अध्यक्ष वैजनाथ शिंदे, उपसरपंच अनिल कांबळे, ग्रामपंचायत सदस्य बंडूराव राणे, संभाजी देसाई, पुंडलिक गुरव, राजाराम घोरपडे उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y72188 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..