‘रवळनाथ’मध्ये सोने तारण, गृहोपयोगी उपकरणांसाठी कर्ज | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘रवळनाथ’मध्ये सोने तारण, गृहोपयोगी उपकरणांसाठी कर्ज
‘रवळनाथ’मध्ये सोने तारण, गृहोपयोगी उपकरणांसाठी कर्ज

‘रवळनाथ’मध्ये सोने तारण, गृहोपयोगी उपकरणांसाठी कर्ज

sakal_logo
By

32306
एम. एल. चौगुले

‘रवळनाथ’मध्ये सोने तारण,
गृहोपयोगी उपकरणांसाठी कर्ज
संस्थापक अध्यक्ष एम. एल. चौगुले यांची माहिती
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. २८ : श्री रवळनाथ को-ऑप. हौसिंग फायनान्स सोसायटीला सोनेतारण कर्ज देण्यास परवानगी दिली आहे. त्यानुसार संस्थेच्या सर्व शाखेत सोने तारण कर्जाची सुविधा उपलब्ध केली आहे, अशी माहिती संस्थापक अध्यक्ष एम. एल. चौगुले यांनी दिली.
ते म्हणाले की, सहज व सुलभ पद्धतीने गृहकर्ज उपलब्ध करणे हाच प्रमुख उद्देश डोळ्यांसमोर ठेवून संस्थेची स्थापना केली आहे. गेल्या २५ वर्षांत आजअखेर संस्थेच्या अर्थसहाय्यातून सुमारे ३२०० घरकुले उभी राहिली आहेत. सभासदांच्या पाल्यांच्या उच्च शिक्षणासाठी आता २५ ऐवजी ५० लाखांपर्यंत शैक्षणिक कर्ज दिले जाते. त्यालाही निबंधकांनी मंजुरी दिली आहे. काही सभासद, ठेवीदार व कर्जदार व ग्राहकांकडून सोनेतारण कर्जाविषयी संस्थेकडे वेळोवेळी विचारणा झाली. त्यामुळेच सोने तारण कर्ज सुरू करण्यास केंद्रीय निबंधकांची परवानगी मागितली होती. त्याला मिळालेल्या मंजुरीनुसार संस्थेच्या गडहिंग्लज, आजरा, चंदगड, नेसरी, कोल्हापूर, जयसिंगपूर, बेळगाव, निपाणी, कुडाळ व गडहिंग्लज या सुविधा केंद्रांत सोनेतारण कर्जाची सोय झाली आहे.
घराचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर सोलर सिस्टीम, टीव्ही, फ्रिज व वॉशिंग मशिन आदी गृहोपयोगी उपकरणांच्या खरेदीसाठी योग्य दरात कर्ज देण्याचा निर्णय संस्थेने घेतला असून त्यालाही केंद्रीय निबंधकांनी मंजुरी दिली आहे. यावेळी उपाध्यक्ष प्रा. व्ही. के. मायदेव, मुख्य कार्यकारी अधिकारी डी. के. मायदेव, सर्व संचालक, सल्लागार, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

चौकट...
सोने तारण कर्ज कशासाठी?
चौगुले म्हणाले, ‘घर बांधणाऱ्या बहुतेकांची शेवटच्या टप्प्यातील कामे पूर्ण करण्यासाठी आर्थिक अडचण होते. अशावेळी तातडीने कर्ज मिळण्याचा एकमेव पर्याय म्हणून सोने गहाण ठेवून त्या अडचणीवर मात केली जाते. ही सोय नसल्याने सभासदांना इतर बँकांकडे जावे लागायचे. म्हणून पाठपुरावा करून संस्थेत ही सुविधा मंजूर करून घेतली.’

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y72215 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..