काजू दर संघर्ष समितीमध्ये सीमाभाग सामावून घेणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

काजू दर संघर्ष समितीमध्ये सीमाभाग सामावून घेणार
काजू दर संघर्ष समितीमध्ये सीमाभाग सामावून घेणार

काजू दर संघर्ष समितीमध्ये सीमाभाग सामावून घेणार

sakal_logo
By

32341
मजरे कारवे : काजू दर संघर्ष समितीच्या बैठकीत मार्गदर्शन करताना नितीन पाटील. शेजारी रमेश देसाई, सुरेश हरेर आदी.

काजू दर संघर्ष समितीमध्ये
सीमाभाग सामावून घेणार
सदस्य नोंदणी सुरू; मजरे कारवेतील बैठकीत निर्णय
सकाळ वृत्तसेवा
चंदगड, ता. २८ ः मजरे कारवे (ता. चंदगड) येथे झालेल्या बळीराजा काजू दर संघर्ष समितीच्या बैठकीत कार्यकारिणी निवड शेतकरी कंपनी स्थापन करण्याचा निर्णय झाला. संघटना कार्यकारिणीमध्ये चंदगड, आजरा, गडहिंग्लज बरोबरच खानापूर व बेळगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना सामावून घेण्याचे ठरले. त्यासाठी सदस्य नोंदणीला सुरुवात झाली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी रमेश देसाई (गवसे) होते.
नितीन पाटील यांनी समितीच्या कार्याचा आढावा घेतला. संघर्ष समितीच्या माध्यमातून गेल्या काही वर्षात काजू उत्पादक शेतकऱ्यांमध्ये जनजागृती केली जात आहे. त्याचा परिणाम म्हणून उत्तम दर्जाची काजू बाजारात येत असून दरही चांगला मिळत आहे. परंतु अजूनही काही व्यापारी फसवणूक करीत आहेत. काटेमारी करून शेतकऱ्यांची लुबाडणूक केली जात आहे. त्यांच्यावर संघर्ष समितीची लक्ष आहे. यामध्ये सुधारणा करावी व योग्य पद्धतीने व्यवहार करावे, असा इशारा त्यांनी दिला. परदेशी काजूमुळे स्थानिक काजू खरेदी करताना दरावर मर्यादा येत आहेत. त्यामुळे परदेशी काजू संदर्भात धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी खासदार संजय मंडलिक यांची भेट घेऊन चर्चा करण्याचे ठरले. काजू उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या घामाचे योग्य दाम मिळावे यासाठी संघटनेची व्याप्ती वाढवण्यावर चर्चा झाली. त्यासाठी शेजारच्या खानापूर व बेळगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना सामावून घेण्याचे तसेच त्यांना कार्यकारिणीत स्थान देण्याचे ठरले. शेतकरी हिताच्यादृष्टीने कंपनी स्थापन करण्यावरही चर्चा झाली. सुरेश हरेर, एस. एन. देसाई, बापू होडगे, धोंडीबा चिमणे यांनीही मार्गदर्शन केले. नरेंद्र पाटील, नामदेव पाटील, कृष्णा पाटील, दयानंद भादवणकर, विठ्ठल गावडे, रणजित गणाचारी, मारुती गणाचारी, गजानन हन्नूरकर, प्रमोद ओऊळकर, मारुती जाधव, आनंद भोसले, संजय कडूकर, किरण शिंदे, रामा गावडे उपस्थित होते. एम. के. पाटील यांनी स्वागत केले. जयसिंग देसाई यांनी आभार मानले.
-----------------
कोट
काजू दराचा संघर्ष अधिक तीव्र केल्याशिवाय न्याय मिळणार नाही. उत्पादकांनी एकत्र येऊन संघर्षाची धार वाढवावी लागेल.
- रमेश देसाई

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y72238 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top