स | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

स

sakal_logo
By

फोटो ः 25169
विजयी उमेदवारांचे फोटो पान २ वर

सांगली अर्बन बॅंकेत सत्ताधारी
गाडगीळ यांचा एकतर्फी विजय

विरोधी बापूसाहेब पुजारी पॅनेलचा दारुण पराभव

सकाळ वृत्तसेवा
सांगली, ता. २८ ः सांगली अर्बन को-ऑप बॅंकेत सलग दुसऱ्यांदा विद्यमान सत्ताधारी गटाच्या अण्णासाहेब गोडबोले प्रगती पॅनेलने वर्चस्व राखले. पॅनेलला १६ जागांवर एकतर्फी विजय मिळाला. विरोधी बापूसाहेब पुजारी बॅंक बचाओ पॅनेलचा दारुण पराभव झाला. सत्ताधारी पॅनेलला दहा हजार तर विरोधी पुजारी पॅनेलला अडीच हजारच्या दरम्यान मते मिळाली. सत्ताधारी गटाचे डॉ. रवींद्र आरळी यापूर्वीच बिनविरोध निवडून आलेत. विजयानंतर सत्ताधारी गटाच्या कार्यकर्ते, उमेदवारांनी गुलालाची उधळण, फटाक्यांची आतिषबाजी केली. सांगली शहरातून मिरवणूक काढली.
मिरज येथील शेतकरी भवनात मतमोजणी झाली. पहिल्या फेरीत सत्ताधारी गटाला साडेतीन हजार विरोधी गटाला पाचशे ते सातशे, दुसऱ्या फेरीत सत्ताधारी गटाला सात हजार विरोधकांना दोन हजार मते मिळाली. शेवटच्या फेरीअखेर सत्ताधारी गटाच्या उमेदवारांना नऊ हजार पाचशे तर विरोधी गटाला दोन ते अडीच हजार मते मिळाली. आज दुपारी सव्वातीन वाजता निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी निकाल जाहीर केला.
दुपारनंतर सत्ताधारी गटाचा विजय निश्‍चित झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी आमदार सुधीर गाडगीळ यांच्या कार्यालयासमोर जल्लोष केला. विद्यमान अध्यक्ष गणेश गाडगीळ, आमदार सुधीर गाडगीळ, शेखर इनामदार आदी कार्यकर्त्यांनी शहरातील प्रमुख मार्गावरून मोटारसायकल फेरी काढली.
सांगली, कोल्हापूर जिल्ह्यासह मराठवाड्यातील परभणी, जालना, बीड, लातूर, हिंगोली जिल्ह्यात बॅंकेचे कार्यक्षेत्र आहे. ३५ शाखा व ६० हजार सभासद आहेत. मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड, कोल्हापूर, सांगली, हिंगोली, परभणी, बीड, लातूर, उदगीर, कुर्डुवाडी, बार्शी, माजलगाव, परतुर, उडीदरा, वसमत, मानवत या शहरांचा समावेश आहे.
...

चौकट
सत्ताधारी पॅनेलचे विजयी उमेदवार व त्यांना मिळालेली मते ः सर्वसाधारण गट-गणेशराव गाडगीळ (९८१३), अनंत मानवी (९५५१), हणमंतराव पाटील (९६५२), डॉ. रवींद्र आरळी (बिनविरोध), श्रीपाद खिरे (९४२६), रणजित चव्हाण (९६५४),
सतीश मालू (९६०४), संजय धामणगावकर (९५४५), रघुनाथ कालिदास (९५३७), शैलेद्र तेलंग (९५१३), संजय पाटील (९५२६). जिल्ह्याबाहेरील गट - श्रीकांत देशपांडे (१०१३९). महिला - स्वाती करंदीकर (९३७५), अश्‍विनी आठवले (९१६७). अनुसूचित जाती, जमाती - मनोज कोरडे (१०१२८). भटक्या जाती, जमाती- रवींद्र भाकरे (१००८५). इतर मागास प्रवर्ग - सागर घोंगडे (१०१९४).
...
बापूसाहेब पुजारी पॅनेलच्या उमेदवारांना मिळालेली मते ः प्रमोद पुजारी (२५२९). अनिलभाऊ कुलकर्णी (२४८९), नानासाहेब शिंदे (२३३५), मिलिंद बोडके (२३४८). शिवाजी मोरे (२३९५), प्रेमचंद पांड्याजी (२२९८), शीतल पाटोळे (२३४८), अतुल राजोपाध्ये (२२८१), अनिल मोहिते (२२९७),
जिल्ह्याबाहेरील गट - ॲड. रवी अडकिणे (२४२२). अपक्ष- शंकर कुलकर्णी (१०८).
महिला राखीव- गौरी तांदळे (१९९५), ज्योती घोरपडे (२३८१). अनुसूचित जाती, जमाती-अरविंद कोरडे (२५६७). भटक्या जाती, जमाती- रमेश भाकरे (२५८८). इतर मागास - एन. आय. काळे (२३६६). अपक्ष - संदीप गवळी (१६९).
...

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y72258 Txt Kolhapur1

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top