‘बाळनाथ’तर्फे गुणवंतांचा सत्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘बाळनाथ’तर्फे गुणवंतांचा सत्कार
‘बाळनाथ’तर्फे गुणवंतांचा सत्कार

‘बाळनाथ’तर्फे गुणवंतांचा सत्कार

sakal_logo
By

32356
करंबळी : बाळनाथ दूध संस्थेतर्फे झालेल्या कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थिनीचा सत्कार करताना अॅड. विकास पाटील. शेजारी अनुप पाटील, शिवाजी पन्हाळकर आदी.

‘बाळनाथ’तर्फे गुणवंतांचा सत्कार
गडहिंग्लज : करंबळी (ता. गडहिंग्लज) येथील बाळनाथ दूध संस्थेतर्फे दहावी परीक्षेतील गुणवंत ५० विद्यार्थी व मार्गदर्शक १० शिक्षकांचा सत्कार झाला. अॅड. विकास पाटील अध्यक्षस्थानी होते. संस्थेचे अध्यक्ष अनुप पाटील, उपाध्यक्ष बाबूराव शेरेकर, महालक्ष्मी पतसंस्थेचे अध्यक्ष शिवाजी पन्हाळकर यांची प्रमुख उपस्थिती होती. पांडुरंग भोईटे यांनी स्वागत केले. प्रा. सुभाष कोरे यांनी विद्यार्थ्यांनी करिअरची दिशा निश्चित करून शैक्षणिक वाटचाल करावी, असे आवाहन केले. जे. बी. कांबळे, सुदेश चौगुले, पन्हाळकर यांनी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करण्याचा सल्ला दिला. अॅड. पाटील यांचेही भाषण झाले. संजय पाटील, प्रवीण पाटील, उमेश पाटील, नारायण जाधव, अशोक पाटील, दयानंद भोईटे, सतीश चौगुले, सुरेश मिसाळ, बाबासाहेब कांबळे, रेखा शेरेकर, सुषमा भोईटे, शंकर चौगुले, विष्णू साळुंखे उपस्थित होते. एम. डी. पाटील यांनी आभार मानले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y72263 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top