महापालिकेची कारवाई | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महापालिकेची कारवाई
महापालिकेची कारवाई

महापालिकेची कारवाई

sakal_logo
By

32459
अतिक्रमण हटाओवेळी
आत्मदहनाचा प्रयत्न

जागृतीनगरमध्ये आठ झोपड्या हटविल्या ; पोलिसांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न

कोल्हापूर, ता. २८ ः सायबरजवळील जागृतीनगर हौसिंग सोसायटी ते अंबाई डिफेन्स कॉलनीतील २० फुटांच्या रस्त्यावर केलेले आठ झोपड्यांचे अतिक्रमण आज महापालिकेने मोठ्या पोलिस बंदोबस्तात हटवले. त्याला विरोध करत एका तरुणाने अंगावर रॉकेल ओतून घेऊन आत्मदहनाचा प्रयत्न केल्याने पोलिसांची धावपळ उडाली, तर महिला व नागरिकांनी पोलिसांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न केला. जमावाला पांगवण्यासाठी सौम्य लाठीमार केला.
अंबाई डिफेन्स कॉलनी व जागृतीनगर झोपडपट्टी दरम्यान २० फुटांचा रस्ता आहे; पण त्यावर झोपडपट्टीधारकांनी अतिक्रमण केल्याने तो अरूंद झाला होता. तिथे दोन समाज वास्तव्यास आहेत. जागृतीनगर हौसिंग सोसायटीमधील राजेंद्र कलकुटकी व इतरांनी अतिक्रमण हटविण्याबाबत महापालिकेकडे तक्रार केली होती. याअनुषंगाने विभागीय कार्यालय तीन व अतिक्रमण विभागाने संयुक्त कारवाई केली. तिथे होणारा विरोध लक्षात घेऊन पोलिस बंदोबस्त तैनात केला. त्या रस्त्यावर असलेले आठ झोपडपट्टीधारकांचे अतिक्रमण जेसीबीच्या साहाय्याने काढण्यास सुरुवात केल्यानंतर महिला, नागरिकांनी विरोध केला.
उपशहर अभियंता बाबूराव दबडे, कनिष्ठ अभियंता सुरेश पाटील आदींनी नागरिकांना रस्त्याची जागा सोडून आत बांधकाम करण्यासाठी समजूत काढण्याचा प्रयत्न केला; पण महिला आक्रमक होत्या. त्यातच एका तरुणाने रॉकेल ओतून घेतले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतल्याने पुढील अनर्थ टळला.
प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई जेसीबी व दोन डंपरच्या साहाय्याने केली. शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, उमेश बागूल, राजारामपुरीचे पोलिस निरीक्षक आर. डी. ओंबासे, कर्मचारी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y72299 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top