
एज्युकेशनसह अन्य पत्रके
बातमी आवश्यक
-
फक्त फोटो : 32444 (यात पुढारीचे नाव काढून टाकणे)
कोल्हापूर : माजी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त कसबा बावडा येथे घरेलू कामगार, रिक्षावाले, वृत्तपत्र विक्रेते यांना रेनकोट वाटप करताना ‘भाजप’चे तानाजी रणदिवे, सुरेश चव्हाण, विजय चव्हाण, कोल्हापूर शहर महानगर वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे संघटक शंकर चेचर, आयाज शेख, श्री. चौगुले, अथर्व गवळी, रोहित चौगले, धनलक्ष्मी महिला पतसंस्थेचे सचिव भरत कवठेकर, अनिल कळेकर आदी उपस्थित होते.
-
रक्तदान शिबिरास प्रतिसाद
कोल्हापूर : कळंबा येथे राजर्षी छत्रपती शाहू जयंतीनिमित्त लिम्रास शैक्षणिक सामाजिक मेडिकल चॅरिटेबल ट्रस्ट आणि सीपीआर रुग्णालय, कोल्हापूर मध्यवर्ती कारागृहातर्फे रक्तदान शिबिर झाले. जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या उपस्थितीत कार्यक्रम झाला. तसेच ओम हॉस्पिटलमार्फत मोफत डोळे तपासणी तर श्री हॉस्पिटल मार्फत मोफत हेल्थ चेकअप केले. कळंबा कारागृह अधीक्षक चंद्रमणी इंदूरकर, हाजी इकबाल देसाई, कळंबा कारागृह उपअधीक्षक कदम आणि लिम्रास ट्रस्ट, कळंबा कारागृह, ओम हॉस्पिटल, श्री हॉस्पिटलचे सर्व कर्मचारी उपस्थित होते.
...
32404
कोल्हापूर : जीवनविद्या मिशन आणि व्हन्नूर ग्रामपंचायतीतर्फे वृक्षांच्या रोपांचे वाटप करताना उपस्थित मान्यवर.
‘जीवन विद्या’तर्फे व्हन्नूरला रोपे
कोल्हापूर : जीवनविद्या मिशन आणि व्हन्नूर ग्रामपंचायतीतर्फे लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जन्मशताब्दीनिमित्त १००० वृक्षाची रोपे दिली. यामध्ये आंबा, चेरी, फणस, सीताफळ, पेरू, आवळा, बेल, चाफा, बकुळ, कडुलिंब आदी फळझाडे, इतर रोपे व्हन्नूर येथील प्रत्येक कुटुंबाला एका रोपाचे वाटप केले. या उपक्रमाची सुरुवात सरपंच पूजा मोरे यांच्या हस्ते झाली. वन अधिकारी केसरकर यांनी वृक्ष संवर्धनाचे महत्त्व ग्रामस्थांना सांगितले. उपसरपंच मंगल कोकणे, सदस्य, अजयकुमार रानगे, ग्रामसमृद्धी अधियानाचे समन्वयक गोलतकर, योगेश लोहार, सूरज लोहार, धनजंय वाळकुंजे, दोडमिसे आदी उपस्थित होते. शासनाच्या ग्रामविकास विभागामार्फत ग्रामीण भागामध्ये ग्रामसमृद्धी अभियान योजना राबविण्याबाबत जीवनविद्या मिशन मुंबई संस्थेस मार्गदर्शक सहयोगी संस्था म्हणून शासनाने नियुक्ती केली. यासाठी ग्रामसृमद्धी अभियानांतर्गत विविध योजना राबविण्यासाठी व्हन्नूरची (ता. कागल) निवड झाली.
...
‘अवनि’तर्फे प्लास्टिक मुक्त शाळा उपक्रम
कोल्हापूर : अवनि संस्था, कोल्हापूर महापालिकेतर्फे दोन वर्षापासून प्लास्टिक मुक्त शाळा उपक्रम राबविण्यात येत आहे. संस्थेमार्फत शाळांमधील कार्यालयीन कामकाजासह अध्यापनात होणारा प्लास्टिक वापर बंद करण्यासाठी शिक्षकांचे तसेच विद्यार्थ्यांचे प्रबोधन करण्यात येणार आहे. या उपक्रमाचे हे तिसरे वर्ष आहे. गेल्या दोन वर्षात 20 शाळा प्लास्टिकमुक्त झाल्या. यावर्षी महापालिकेच्या 40 शाळा प्लास्टिक मुक्त शाळा करण्याचा ‘अवनि’चा मानस आहे. या उपक्रमांतर्गत प्लास्टिक कचऱ्याचे वर्गीकरण करण्याबाबत आणि प्लास्टिकमुळे होणाऱ्या दुष्परिणाकरीता जनजागृती, व्याख्यानाचे आयोजन करण्यात येईल. ‘अवनि’च्या अध्यक्षा अनुराधा भोसले, प्रकल्प समन्वयक विक्रांत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
...
कस्तुरबा गांधी रोपवाटिकेचे उद्घाटन
कोल्हापूर : महात्मा गांधी फाउंडेशन, अवनि संस्थेच्या सेंद्रिय शेती प्रकल्प आहे. वाशी येथील पाच एकर जागा फाउंडेशनने घेतली आहे. या जागेत शेतकऱ्यांच्या सहभागातून सेंद्रिय शेतीचा प्लॉट विकसित करण्यात येत आहे. यामध्ये औषधी वनस्पती आणि हंगामानुसार फुल झाडे, फळ झाडे, जंगली झाडे, इतर रोपेवाटिकेचे उद्घाटन झाले. अवनि संस्थेचे उपाध्यक्ष संजय पाटील, भोगावती कारखान्याचे माजी संचालक बी. ए. पाटील, कृषी सहाय्यक अधिकारी रोहित बावडेकर, ग्रामसेवक नीलेश कुंभार, सरपंच शिल्पा टेळके, आसपासच्या गावातील शेतकरी उपस्थित होते. चर्चासत्राचे आयोजन केले. यामध्ये शासकीय योजना, सिझनेबल भाजीपाला, फळबाग ,पॉलीहाऊस सीड बँक, बी-बियाणे, बीजप्रक्रिया आदीवर चर्चा झाली. रवी कु-हाडे, सचिन ठाणेकर, मेघा चौगुले, रुपाली सावर्डे, रेखा कांबळे, शामल गायकवाड, इम्रान शेख, शाहरुख आटपाडे, विक्रांत जाधव उपस्थित होते.
...
32421
कोल्हापूर : प्रिन्सेस पद्माराजे गर्ल्स प्रशालेत विद्यार्थिनीचा गुणगौरव समारंभप्रसंगी मान्यवर.
प्रिन्सेस पद्माराजे’त गुणगौरव समारंभ
कोल्हापूर : प्रिन्सेस पद्माराजे गर्ल्स प्रशालेत विद्यार्थिनीचा गुणगौरव समारंभ झाला. मुख्याध्यापिका एस. आर. चौगले यांनी स्वागत केले. ''एव्हरेस्ट कन्या'' कस्तुरी सावेकर हिचा सत्कार झाला. दहावीत क्रमांकप्राप्त विद्यार्थिनी सिध्दी आवटे, अनुश्री बारटक्के, श्रेया मोहिते तसेच सेजल कोरे हिने ''नजरिया'' लघुपटात अभिनय केल्याबद्दल, क्रीडा विभागात राजनंदिनी लाड (कराटे), सलोनी विभूते (नेमबाजी), गौरी साळोखे (नेमबाजी) यांचा सत्कार केला. कस्तुरीने एव्हरेस्ट सर करताना आलेले अनुभव सांगितले. पी. एस. हेरवाडे म्हणाले, ‘‘उत्तुंग यश प्राप्तीसाठी परिश्रम, जिद्द, चिकाटीची आवश्यकता असते. तसेच या गुणवंत विद्यार्थिनींचा आदर्श ठेवून मार्गक्रमण करा.’’ पर्यवेक्षक डी. के. गुरव यांनी आभार मानले. उपमुख्याध्यापक व्ही. एन. तलबार, पर्यवेक्षिक पी. एन. सावंत उपस्थित होते. एम. एस. सुर्यवंशी यांनी सूत्रसंचालन केले.
...
32434
कोल्हापूर : राजर्षी छत्रपती शाह कॉलेजमधील कार्यशाळेत बोलताना डॉ. एम. बी. शेख.
शाहू कॉलेजमध्ये कार्यशाळा
कोल्हापूर, ता.२८ : राजर्षी छत्रपती शाह कॉलेजमध्ये ‘महाविद्यालयाच्या विकासात प्रशासकीय सेवकांचे योगदान'' यावरती एकदिवशीय कार्यशाळा झाली. रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य डॉ. एम. बी. शेख यांच्या हस्ते उद्घाटन झाले. डॉ. शेख म्हणाले, ‘‘प्रशासकीय सेवक हा महाविद्यालयाचा कणा आहे. प्रशासकीय सेवकांनी सर्व माहितीचा अभ्यास करून माहिती जतन करणे गरजेचे आहे.’’ प्राचार्य डॉ. व्ही. व्ही. किल्लेदार म्हणाले, ‘‘प्रशासकीय सेवकांनी समोर येणाऱ्या प्रत्येक घटकाशी म्हणजे विद्यार्थी, शिक्षकांशी आपुलकीने वागावे. जेणेकरून महाविद्यालयातील वातावरण आनंदी राहते. महाविद्यालय अधिक सक्षम करण्यासाठी शिपाई ते प्राचार्यांनी आपली कर्तव्ये व्यवस्थितपणे पार पाडावित.’’
डॉ. एम. बी. देशमुख यांनी ‘उच्च शिक्षणात प्रशासकीय सेवकाचे योगदान आणि कौशल्य'' तर दुसऱ्या सत्रात सचिन टिकेकर यांनी ‘निवृत्तीवेतनाचे प्रकार अत्यावश्यक कागदपत्रे व मान्यता'' यावर मार्गदर्शन केले. कार्यालयीन अधीक्षक बी. एम. शिंदे यांनी स्वागत केले. डॉ. एस. पी. पवार यांनी आभार मानले. समारोप सत्राचे अध्यक्षपद प्राचार्य डॉ. किल्लेदार यांनी भूषविले. प्रा. विनोद आखाडे यांनी सूत्रसंचालन केले. उपप्राचार्य डॉ. के. व्ही. गायकवाड यांनी समारोप सत्राचे आभार मानले.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y72330 Txt Kopcity Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..