वाहतूक नियमांबाबत प्रबोधन करा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वाहतूक नियमांबाबत प्रबोधन करा
वाहतूक नियमांबाबत प्रबोधन करा

वाहतूक नियमांबाबत प्रबोधन करा

sakal_logo
By

32416
-----
वाहतूक नियमांबाबत प्रबोधन करा
इचलकरंजीत अमृत भोसले युवाशक्तीतर्फे निवेदनाद्वारे मागणी
इचलकरंजी, ता. २८ ः वाहनधारकांमधून वाहतूक नियमांचे पालन व्हावे. अपघाताचे प्रमाण कमी व्हावे यासाठी शहरातील रहदारीच्या ठिकाणी असलेली सिग्नल व्यवस्था कार्यान्वित करून नेहमी सुरू ठेवावी. सिग्नल यंत्रणेवरील डाव्या बाजूस वळण्यासाठी पट्टे मारून जागा खुली ठेवावी. तसेच गाड्या थांबत असलेल्या सीमारेषा पुन्हा कलर करून घ्याव्यात. वाहतुकीच्या नियमांबाबत नागरिकांचे प्रबोधन करावे, यांसह अन्य मागणीचे निवेदन अमृत भोसले युवाशक्तीतर्फे वाहतूक शाखेचे निरीक्षक विकास अडसूळ यांना दिले.
इचलकरंजी शहरात वाहनधारकांची संख्या वाढत आहे. वाढत्या वाहनांमुळे मार्गावर पडणारा ताण व त्यातून होणारे अपघात कमी होण्यासाठी शहरात मलाबादे चौक, हवामहाल चौक येथे स्वयंचलित वाहतूक सिग्नल व्यवस्था होती. शिवतीर्थ चौक, शाहू महाराज चौक, डेक्कन चौक, राजवाडा चौक आदी ठिकाणी नव्याने सिग्नल यंत्रणा कार्यान्वित केली आहे. मात्र सध्या नवीन सिग्नल सुरू असून जुने सिग्नल बंद आहेत. वाढणाऱ्या वाहतुकीमुळे शहरातील सर्व सिग्नल सुरू असणे आवश्यक आहे. तसेच सुरू असलेल्या सिग्नलच्या डाव्या बाजूचा काही भाग अत्यावश्यक वाहनासाठी राखीव ठेवणे आवश्यक आहे. ज्यामुळे अॅबुलन्स, अग्निशामक वाहने, तसेच वाहतुकीचा ताण कमी होण्यासाठी सिग्नल सुरू असताना डाव्या बाजूस जाणाऱ्‍या वाहनांना थोडी जागा ठेवणे गरजेचे आहे. मात्र शहरात या मार्गावर कोणत्याही प्रकारचे सूचना बोर्ड, पट्टे नसल्याने वाहनधारक सिग्नल सुरू असते वेळी पूर्ण मार्गाची अडवणूक करीत आहेत. परिणामी अत्यावश्यक वाहनांसाठी मार्ग काढताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यामुळे सिग्नल असलेल्या चौकांमध्ये काही प्रमाणात राखीव जागा ठेवून ती मोकळी ठेवणे गरजेचे बनले आहे. यांसह नागरिकांमधून वाहतूक नियमांचे प्रबोधन करणे आवश्यक आहे. जेणे करून होणाऱ्‍या कारवाईपासून बचाव होईल, असे निवेदनामध्ये नमूद केले आहे. शिष्टमंडळात पैलवान अमृत भोसले, अनिस म्हालदार, अवधूत पाटील, विजय कुरणे, ताहीर सय्यद, शाहबाज जमादार, श्रीशैल मुगळी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y72347 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..