‘धनगरबाडी’च्या सांडव्यामुळे नुकसान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘धनगरबाडी’च्या सांडव्यामुळे नुकसान
‘धनगरबाडी’च्या सांडव्यामुळे नुकसान

‘धनगरबाडी’च्या सांडव्यामुळे नुकसान

sakal_logo
By

32425
आजरा : धनगरबाडी तलावाच्या सांडव्यामुळे शेती व पिकांचे नुकसान होत असल्याबाबत तहसीलदार विकास अहिर यांना निवेदन देताना शेतकरी.

‘धनगरबाडी’च्या सांडव्यामुळे नुकसान
शेतकऱ्यांची तहसीलदारांकडे धाव; महसूलसह पाटबंधारे विभागाला दिले निवेदन
सकाळ वृत्तसेवा
आजरा, ता. २८ : धनगरमोळा (ता. आजरा) येथील धनगरबाडी तलावाच्या सांडव्यामुळे शेतीचे नुकसान होत असल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली आहे. याबाबतचे निवेदन आजऱ्याचे तहसीलदार, जिल्हा व तालुका पाटबंधारे विभागाला देण्यात आले. प्रशासनाने याबाबत ठोस पावले उचलून सांडव्यामुळे शेतीचे नुकसान होऊ नये यासाठी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, धनगरबाडी तलावालगत शेतजमीन आहे. धनगरबाडी तलावाचा सांडवा शेतातून जातो. गेली तीन वर्षे या भागात अतिवृष्टी होत आहे. त्यामुळे सांडव्यातून धोक्याची पातळी ओलांडून पाणी वाहत आहे. हे पाणी सांडव्यातून ओव्हरफ्लो होऊन बाहेर पडत असल्याने शेती तुटून जाणे, पिके (ऊस, भात, मेसकाठी, फळपिकांचे) वाहून जाऊन नुकसान होणे, हे गेली तीन वर्षे होत आहे. या नुकसानीबाबत कार्यालयाला वेळोवेळी सूचना देऊनदेखील दुर्लक्ष केले जात आहे. हा सांडवा धोकादायक बनला आहे. तो मूळ प्रवाह सोडून वाहत आहे. गतवर्षी तुटून गेलेल्या शेत जमिनीचे व पिकांचे सर्वेक्षण करण्यात आले; परंतु याबाबत काहीही नुकसानभरपाई मिळाली नसल्याचे निवेदनात म्हटले आहे. म्हणूनच या सांडव्यामुळे नुकसान झालेली जमीन संपादित करून त्याची नुकसान भरपाई त्वरित मिळावी. या सांडव्यामुळे गतवर्षी ज्या पद्धतीने नुकसान झाले तसेच नुकसान यंदाही झाल्यास संबंधित विभागाला जबाबदार धरण्यात येणार आहे. निवेदनावर तानाजी विष्णू जाधव, आनंदा गोविंद खरुडे, योगेश आनंदा जाधव, उत्तम तुकाराम माडभगत, धाकू शंकर माडभगत, लक्ष्मण तुकाराम माडभगत यांच्यासह शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
---------------
चौकट
...तर मेघोलीसारखी परिस्थिती
गतवर्षी मेघोली बांध फुटल्यामुळे शेती वाहून गेली होती. तशीच स्थिती येथेही होण्याची भीती आहे. सांडव्यालगत मोठे भगदाड पडले आहे. अतिवृष्टीत यातून पाण्याचा प्रवाह वेगाने बाहेर पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. जवळच धनगरमोळा हे गाव असल्याने गावालाही धोका आहे, असे शेतकरी तानाजी जाधव यांनी सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y72357 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top