योगेश्‍वरी कॉलनी आंदोलन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

योगेश्‍वरी कॉलनी आंदोलन
योगेश्‍वरी कॉलनी आंदोलन

योगेश्‍वरी कॉलनी आंदोलन

sakal_logo
By

32469

योगेश्‍वरी कॉलनीत
खड्ड्यांचे घातले श्राद्ध

कंदलगाव, ता. २८ ः योगेश्‍वरी कॉलनी ते लक्ष्मीबाई विद्यामंदिर रस्त्याच्या रखडलेल्या कामाबाबत परिसरातील नागरिक, विद्यार्थ्यांनी खड्ड्यांचे श्राद्ध घालून महापालिका प्रशासनाचा निषेध केला. नऊ वर्षांपासून रस्त्याचे काम रखडले आहे. वारंवार प्रशासनाला निवेदन देऊनही रस्त्यांच्या समस्येला सामोरे जावे लागते. पावसाळ्यात लहान मुले शाळेत जाताना अपघात होत आहेत. जरगनगरातील महानगरपालिकेची चांगली शाळा म्हणायचे आणि त्याकडे जाणाऱ्या रस्त्याकडे दुर्लक्ष करायचे, असा प्रकार असल्याने नागरिकांनी खड्ड्यांचा श्राद्ध घातला. तसेच प्रशासनाच्या नावाने शंखध्वनी करून निषेध केला. लवकरात लवकर रस्ता करून नागरिकांची गैरसोय दूर करावी, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला. यावेळी बाळासाहेब देसाई, निवास भोसले, राहुल चौधरी, लखन काझी, शीतल नलवडे, नाना सावंत, संपदा मुळेकर, सविता संकपाळ सहभागी होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y72414 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..