गतवर्षी आणि आज - पाऊस आणि पाणीसाठा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गतवर्षी आणि आज - पाऊस आणि पाणीसाठा
गतवर्षी आणि आज - पाऊस आणि पाणीसाठा

गतवर्षी आणि आज - पाऊस आणि पाणीसाठा

sakal_logo
By

डावीकडचा फोटो घेणे

32470

जिल्ह्यात पाऊस यंदा रुसला...
जूनमध्ये धरण क्षेत्रात केवळ ३३ टक्केच पावसाची नोंद; गतवर्षीचे प्रमाण ४१ टक्के

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २८ ः जिल्ह्यात गतवर्षी आजच्या दिवशी सरासरी तब्बल १०० मिलिमीटर पाऊस झाला होता, यावर्षी तो केवळ ७.२ मिलिमीटर झाला आहे. अशीच स्थिती धरण क्षेत्रातही आहे. त्यामुळे यंदा जिल्ह्यात पाऊस रुसला असल्याचे दिसून येते. गतवर्षी जूनमध्ये झालेल्या पावसाने हाहाकार उडाला होता. यंदा मात्र त्याच्याकडे डोळे लागून राहिले आहेत.
जिल्ह्यातील एकूण सर्व धरण क्षेत्रात गतवर्षी १ जून ते २८ जूनपर्यंत तब्बल ८९९ मिलिमीटर सरासरी पावसाची नोंद झाली होती. आजपर्यंत २४७ मिलिमीटर पावसाची सरासरी नोंद झाली आहे. गतवर्षीपेक्षा यंदा जिल्ह्यातील सर्वच धरण क्षेत्रांत ३३ टक्केच पावसाची नोंद झाली, तर गतवर्षी हे प्रमाण ४१ टक्के होते. गतवर्षी ४३.९० टीएमसी, तर आज २६.७९ टीएमसी पाणीसाठा जिल्ह्यातील सर्व धरणांत आहे. गतवर्षी पंचगंगा नदी खोऱ्यातील धरणात सरासरी ७.२७ टीएमसी पाऊस झाला होता. त्याचे टक्केवारीतील प्रमाण ४१ टक्के होते. यावर्षी त्याची सरासरी ५.६८ टीएमसी पाऊस झाला असून, ३३ टक्के प्रमाण आहे.
---------------------------
धरणांची गतवर्षी आणि आजची स्थिती -
धरण २८ जून २०२१ २८ जून २०२२ पाणीसाठा टक्केवारीत
*राधानगरी ७५. ०४ ६७.३७ २८ टक्के
*तुळशी ५०.६२ ३८.९३ ४० टक्के
*कासारी ३०.४६ २५.७४ ३३ टक्के
*कुंभी ३९.४४ ३०.३२ ३९ टक्के
----------------------------
धरणक्षेत्रात सरासरी गतवर्षी ११०७ दलघमी सरासरी पाणीसाठा होता.
यंदा तो ३६० दलघमी आहे. साधारण ३० टक्के पाऊस झाला आहे.
राधानगरी धरणात वर्षाला सरासरी ४५०० ते ६७०० दलघमी
---------------------------
*जिल्ह्यात एकूण चार मोठी धरणे आणि १० मध्यम प्रकल्प
*गतवर्षी आजच्या दिवशी जिल्ह्यातील सर्व धरणांत ४३.९० टीएमसी पाणीसाठा
यंदा आजच्या दिवशी २६.७९ टीएमसी पाणीसाठा
---------------------------
आजच्या दिवशीचा आणि गतवर्षी तालुकानिहाय पाऊस मिलिमीटरमध्ये असा -
तालुका ---- २८ जून २०२२ ---- २८ जून २०२१
हातकणंगले ---- २.०४ ---------- ४०.००
शिरोळ ----- १.०१ ---------- ३३.००
पन्हाळा ----- ९.०२ ---------- ९८.०६
शाहूवाडी ----- १४.०४ ---------- १८२.५
राधानगरी ----- ११.०८ ---------- १०६.०५
गगनबावडा ---- ३५.०३ ---------- ३२२.०१
करवीर ----- ३.०७ ---------- ७१. ०२
कागल ----- ४.०८ ---------- ६४.०२
गडहिंग्लज ----- १.०३ ---------- ७०.००
भूदरगड ------- १६.०२ ---------- १८८.०५
आजरा ------- ६.०२ ---------- १०१.०९
चंदगड ------- १७.०० ------ १५१.०४
सरासरी - ७.२ ---------- १००.४
--------------------------------------

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y72415 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top