गतवर्षी आणि आज - पाऊस आणि पाणीसाठा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गतवर्षी आणि आज - पाऊस आणि पाणीसाठा
गतवर्षी आणि आज - पाऊस आणि पाणीसाठा

गतवर्षी आणि आज - पाऊस आणि पाणीसाठा

sakal_logo
By

डावीकडचा फोटो घेणे
-------------------

32470

जिल्ह्यात पाऊस यंदा रुसला...

जूनमध्ये धरण क्षेत्रात ३३ टक्केच पाऊस ; गतवर्षी होता ४१ टक्के

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २८ ः जिल्ह्यात गतवर्षी आजच्या दिवशी सरासरी तब्बल १०० मिलिमीटर पाऊस झाला होता, यावर्षी तो केवळ ७.२ मिलिमीटर झाला आहे. अशीच स्थिती धरण क्षेत्रातही आहे. त्यामुळे यंदा जिल्ह्यात पाऊस रुसला असल्याचे दिसून येते. गतवर्षी जूनमध्ये अधिक पाऊस झाला होता. यंदा मात्र त्याच्याकडे डोळे लागून राहिले आहेत. जिल्ह्यात गतवर्षी जून मध्ये ३९१.०३ मिलीमीटर पाऊस झाला होता. यावर्षी तो केवळ ९३.०२ आहे. गतवर्षीची सरासरी ११९ टक्के होती. यारव्षी ती केवळ २८.५ टक्के आहे.

जिल्ह्यातील एकूण सर्व धरण क्षेत्रात गतवर्षी १ जून ते २८ जूनपर्यंत तब्बल ८९९ मिलिमीटर सरासरी पावसाची नोंद झाली होती. आजपर्यंत २४७ मिलिमीटर पावसाची सरासरी नोंद झाली आहे. गतवर्षीपेक्षा यंदा जिल्ह्यातील सर्वच धरण क्षेत्रांत ३३ टक्केच पावसाची नोंद झाली, तर गतवर्षी हे प्रमाण ४१ टक्के होते. गतवर्षी ४३.९० टीएमसी, तर आज २६.७९ टीएमसी पाणीसाठा जिल्ह्यातील सर्व धरणांत आहे. गतवर्षी पंचगंगा नदी खोऱ्यातील धरणात सरासरी ७.२७ टीएमसी पाणी साठा होता. त्याचे टक्केवारीतील प्रमाण ४१ टक्के होते. यावर्षी त्याची सरासरी ५.६८ टीएमसी पाणी साठा आहे, त्याचे प्रमाण ३३ टक्के आहे.
---------------------------
धरणांची गतवर्षी आणि आजची स्थिती - (पाणीसाठी दलघमी मध्ये)
धरण २८ जून २०२१ २८ जून २०२२
*राधानगरी ७५. ०४ ६७.३७
*तुळशी ५०.६२ ३८.९३
*कासारी ३०.४६ २५.७४
*कुंभी ३९.४४ ३०.३२

धरणक्षेत्रात सरासरी गतवर्षी ११०७ मिलीमीट पाऊस झाला होता.
यंदा तो ३६० मिलीमीटर आहे. गेल्यावर्षीच्या प्रमाणात केवळ ३० टक्के पाऊस यावर्षी झाला.
राधानगरी धरणात वर्षाला सरासरी ४५०० ते ६७०० मिलीमीटर पाऊस पडतो.
---------------------------
*जिल्ह्यात एकूण चार मोठी धरणे आणि १० मध्यम प्रकल्प आहेत.
*गतवर्षी आजच्या दिवशी जिल्ह्यातील सर्व धरणांत ४३.९० टीएमसी पाणीसाठा
यंदा आजच्या दिवशी २६.७९ टीएमसी पाणीसाठा
---------------------------
आजच्या दिवशीचा आणि गतवर्षी तालुकानिहाय पाऊस मिलिमीटरमध्ये असा -
तालुका ---- २८ जून २०२२ ---- २८ जून २०२१
हातकणंगले ---- २.०४ ---------- ४०.००
शिरोळ ----- १.०१ ---------- ३३.००
पन्हाळा ----- ९.०२ ---------- ९८.०६
शाहूवाडी ----- १४.०४ ---------- १८२.५
राधानगरी ----- ११.०८ ---------- १०६.०५
गगनबावडा ---- ३५.०३ ---------- ३२२.०१
करवीर ----- ३.०७ ---------- ७१. ०२
कागल ----- ४.०८ ---------- ६४.०२
गडहिंग्लज ----- १.०३ ---------- ७०.००
भूदरगड ------- १६.०२ ---------- १८८.०५
आजरा ------- ६.०२ ---------- १०१.०९
चंदगड ------- १७.०० ------ १५१.०४
सरासरी - ७.२ ---------- १००.४
--------------------------------------------------

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y72415 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..