भाजपच्या कार्यकर्त्यांना सज्ज राहाण्याचे आदेश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भाजपच्या कार्यकर्त्यांना सज्ज राहाण्याचे आदेश
भाजपच्या कार्यकर्त्यांना सज्ज राहाण्याचे आदेश

भाजपच्या कार्यकर्त्यांना सज्ज राहाण्याचे आदेश

sakal_logo
By

भाजप कार्यकर्त्यांना सज्ज राहण्याचे आदेश
प्रमुख कार्यकर्ते मुंबईला; सत्ता नाट्याच्या राजकीय घडामोडींना वेग
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता.२८ ः राज्यात सुरू असणाऱ्या सत्तांतर प्रयत्नांच्या घडामोडींना वेग आला आहे. त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यातील भाजपच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना सज्ज राहाण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच अचानक बोलावल्यास मुंबईत येण्याची तयारी ठेवा, असे सूचित केले असून त्या दृष्टिकोनातून कार्यकर्त्यांनी तयारी सुरू केली आहे.
नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड केले शिवसेना आणि काही अपक्ष आमदार घेऊन ते सुरत आणि तेथून गुवाहाटीला गेले. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आल्याचे सांगितले जाते. लवकरच राज्यात सत्तांतर होईल, असे संकेत भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून दिले जात आहेत. राज्यातही राजकीय घडामोडींना वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर भाजपच्या आमदारांना मुंबईत बोलावून घेण्यात आले आहे. तसेच प्रमुख कार्यकर्त्यांनाही बोलावले आहे. स्थानिक पातळीवरील कार्यकर्त्यांनाही सज्ज राहाण्याच्या सूचना दिल्या आहेत. पुढील दोन-तीन दिवसांत काही राजकीय घडामोडी घडतील त्यातून राज्यात सत्तापालट होईल, असा अंदाज भाजपचे काही नेते बोलून दाखवत आहेत. मुंबईतील कार्यालयातून जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांना सज्ज राहाण्याची सूचना देण्यात आली असून, सत्तांतर झाल्यास शपथविधीसाठी मुंबईत उपस्थित राहाता येईल या दृष्टीने वाहनांची व्यवस्था करण्यास सांगण्यात आले आहे.

चर्चा मंत्रिपदाची
जिल्ह्यातील आमदार प्रकाश आबिटकर आणि माजी मंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर हे दोघे सध्या एकनाथ शिंदे यांच्याबरोबर आहेत. त्यामुळे त्यांची नावे मंत्रिपदाच्या शर्यतीत आहेत. याशिवाय आमदार प्रकाश आवाडे आणि विनय कोरे यांनाही मंत्रिपद मिळेल, असा अंदाज राजकीय वर्तुळात व्यक्त केला जात आहे. कार्यकर्त्यांमध्ये मात्र आतापासूनच मंत्रिपद कोणाला मिळणार? पालकमंत्री कोण असणार याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y72439 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..