पोलीस वृत्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पोलीस वृत्त
पोलीस वृत्त

पोलीस वृत्त

sakal_logo
By

सोन्याच्या दुकानात
पाटणे फाटा येथे चोरी

चंदगड, ता. २८ ः पाटणे फाटा (ता. चंदगड) येथील विपुल विजय बांदिवडेकर यांच्या सोन्याच्या दुकानातून भामट्याने हातचलाखी करीत सुमारे दीड लाख रुपयांचे सोने पळविले. ३० मे रोजी ही घटना घडली. यासंदर्भात बांदिवडेकर यांनी आज येथील पोलिसांत तक्रार दाखल केली.
यासंदर्भात माहिती अशी ः बांदिवडेकर यांच्या दुकानात अनोळखी व्यक्ती येऊन चांदीच्या ताईताची मागणी केली. त्याची किंमत तीस रुपये दिल्यानंतर सोन्याच्या कान साखळीसंदर्भात विचारणा केली. काऊंटरच्या खालील लाकडी ट्रेमधील सोन्याच्या वस्तू पाहण्यासाठी मागून घेतल्या. ते पाहत असतानाच हातचलाखी करीत सोन्याची कान चैन लंपास केली. त्याची किंमत दिड लाख रुपये होते. नंतर खरेदी करतो असे सांगत तो दुकानातून निघून गेला. पोलिस उपनिरीक्षक नाईक तपास करीत आहेत.

ओंडका डोकीत
पडून एकाचा मृत्यू
चंदगड, ता. २८ ः सुरुते (ता. चंदगड) येथील लक्ष्मण नागो कांबळे (वय ६५) यांचा डोकीत लाकडाचा ओंडका पडून मृत्यू झाला. आज सकाळी ही दुर्घटना घडली. कांबळे गावानजीक बारी नावच्या शेतात जळाऊ लाकडे तोडण्यासाठी गेले होते. टेकडीवर लाकडे तोडून त्याचे ओंडके रचले. त्यावर बसून तंबाखू मळत असतानाच ओंडका निसटून ते टेकडीवरुन खाली घसरले. त्याचवेळी पाठोपाठ लाकडाचा मोठा ओंडकाही घरंगळत येऊन त्यांच्या डोकीत आदळला. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना येथील ग्रामीण रुग्णालयात आणत असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y72500 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..