कोरोना | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोरोना
कोरोना

कोरोना

sakal_logo
By

जिल्ह्यात कोरोनाचे
आठ रुग्ण आढळले
कोल्हापूर, ता. २८ ः कोरोनाचे आज दिवसभरात नवे आठ रुग्ण आढळले. त्यामुळे उपचार घेणाऱ्या बाधितांची संख्या ५४ झाली आहे. यातील सात रुग्ण शासकीय व खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. उर्वरित सर्वजण सौम्य लक्षणाचे असल्याने ते घरातच उपचार घेत आहेत. १५ दिवसांपासून बाधिताच्या संख्येत जिल्ह्यात पुन्हा एकदा वाढ होत आहे. आजही आठ नवे बाधित सापडले आहेत. यात करवीर तालुक्यातील चार जण तर अन्य चार तालुक्यात प्रत्येकी एक नवा बाधित सापडला आहे. सर्वांचीच लक्षणे सौम्य असल्याने बहुतेकांना घरी विश्रांती घ्यावी तसेच औषधोपचार घ्यावेत असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.
बाधितांची वाढती संख्या विचारात घेता सर्वांनी खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे. यातही ज्या व्यक्ती व्याधीग्रस्त आहेत तसेच ज्यांनी कोरोना प्रतिबंधात्मक लस अद्यापि घेतलेली नाही अशा व्यक्तींनी विशेष खबरदारी घेण्याची आहे. तसेच कोरोना प्रतिबंधक लस घ्यावी असे आवाहन शासकीय वैद्यकीय यंत्रणे कडून करण्यात येत आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y72503 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top