पुरवठाधारकांना आवाहन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पुरवठाधारकांना आवाहन
पुरवठाधारकांना आवाहन

पुरवठाधारकांना आवाहन

sakal_logo
By

01653
राधानगरी पंचायत समिती कर्मचारी
सहकारी पतसंस्थेचा १४ टक्के लाभांश
कसबा तारळे : राधानगरी पंचायत समिती कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या सभासदांसाठी १४ टक्के लाभांश निश्‍चित केला असून, संस्थेला आर्थिक वर्षात २८ लाख १८ हजार रुपयांचा निव्वळ नफा झाल्याची माहिती अध्यक्ष विजय मोरे यांनी दिली. पतसंस्थेच्या २४ व्या वार्षिक सभेत अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. संस्थापक अध्यक्ष बाबूराव शिरसाट, सुकाणू समितीचे पदाधिकारी विलासराव पाटील व नामदेव पाटील प्रमुख उपस्थित होते. श्री. मोरे यांनी अहवालवाचन करताना सांपत्तिक स्थितीचे विवेचन केले. दीपप्रज्वलन संस्थापक शिरसाट, विलासराव पाटील, अध्यक्ष विजय मोरे, उपाध्यक्ष साताप्पा पाटील, संचालक आर. एस. पाटील आदींच्या हस्ते झाले. निवृत्त सभासदांचा तसेच विविध ठिकाणी निवड झालेल्या सभासदांचा सत्कार झाला. संस्थापक शिरसाट, संचालक आर. एस. पाटील, पांडुरंग बर्गे, डी. पी. पाटील, धनाजी महेकर आदींची भाषणे झाली. संचालक कुलदीप पाटील, बळवंत पोवार, विलास निचिते, बळवंत चौगले, पांडुरंग कुंभार, संभाजी खोत, मंगल पाटील, प्रभावती जाधव आदींसह सभासद उपस्थित होते. व्यवस्थापक संतोष शिऊडकर यांनी स्वागत केले व आभार मानले.

00371
म. ह. शिंदे महाविद्यालयात रोजगार मेळावा
असळज : तिसंगी (ता. गगनबावडा) येथील म. ह. शिंदे महाविद्यालयात विविध कंपन्यांचा रोजगार मेळावा झाला. मेळाव्यास प्रमुख पाहुणे ज्ञानसाधना शिक्षण प्रसारक मंडळ, निवडेचे सचिव स्वप्निल शिंदे तर अध्यक्षस्थानी प्रभारी प्राचार्य डॉ. बी. एस. पडवळ उपस्थित होते. एल.पी.एल. आणि म. ह. शिंदे महाविद्यालयात सामंजस्य करार झाला. एल.पी.एल. अॅकॅडमी, लँप पँथ फाउंडेशनने रोजगाराच्या संधीची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी महूद उस्मान, प्रमुख अमितकुमार कांबळे, कृष्णात पाटील, धनलोभे यांनी दिली. मुलाखतीमधून २० मुलांची निवड केली. डॉ. आर. पी. पाटील यांनी स्वागत केले. प्रा. बी. डी. पाटील आभार यांनी मानले. प्रा. ए. डी. पिंजरकर यांनी सूत्रसंचालन केले.


वस्तूच्या पुरवठ्यासाठी दरपत्रकाचे आवाहन
कोल्हापूर ः राष्ट्रीय छात्रसेना मुलींचे वार्षिक प्रशिक्षण शिबिर १ ते १० जुलैदरम्यान एनसीसी भवनात होणार आहे. पुरवठादारांनी या प्रशिक्षणासाठी लागणाऱ्या वस्तूंचा पुरवठा करण्यासाठी दरपत्रक मुलींचे राष्ट्रीय छात्रसेना पथक (एनसीसी भवन) येथील कार्यालयात देण्याचे आवाहन ६ महाराष्ट्र मुलींचे राष्ट्रीय छात्रसेना पथकाचे समादेशक अधिकारी कर्नल एस. गणपती यांनी केले आहे. सर्वप्रकारची धान्ये, तेल, डाळी, मसाल्याचे पदार्थ आदी, बेकरी उत्पादने, मटण, चिकन व अंडी, दूध व दुग्धजन्य पदार्थ, पालेभाजी, फळभाजी आणि फळे, स्वयंपाकी, दोन मदतनीस यासाठी दरपत्रक मागविण्यात येत आहेत, असेही पत्रकात म्हटले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y72505 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top