कुटुंबाला हातभार लावत त्याने मिळवले ९६ टक्के | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कुटुंबाला हातभार लावत त्याने मिळवले ९६ टक्के
कुटुंबाला हातभार लावत त्याने मिळवले ९६ टक्के

कुटुंबाला हातभार लावत त्याने मिळवले ९६ टक्के

sakal_logo
By

32561
दिगंबर पोकळे

कुटुंबाला हातभार लावत
त्याने मिळवले ९६ टक्के
चंदगड, ता. २९ : येथील दिगंबर संतोष पोकळे या विद्यार्थ्याने दहावीच्या परीक्षेत ९६ टक्के गुण मिळवले. वडिलांवर बेरोजगाराची कुऱ्हाड कोसळली असताना भाजीपाला विकण्याबरोबर इतर पडेल ती कामे करून कुटुंबाला हातभार लावत त्याने हे यश संपादन केले. त्यामुळे त्याचे परिसरातून कौतुक होत आहे.
दिगंबरचे वडील संतोष हे एका काजू कारखान्यात रोजंदारी मजूर होते. कोरोना कालावधीत हा कारखाना बंद झाला आणि पोकळे कुटुंबीयांची आर्थिक स्थिती खालावली. या काळात अन्यत्र रोजगार शोधायचा म्हटला तरी काम मिळत नव्हते. दिगंबरला हे पाहवत नव्हते. त्याने भाजीपाला विक्रीचा व्यवसाय सुरू केला. सकाळच्या वेळेत गल्लीतून फिरून भाजी विकायची. दुपारच्या वेळेत अभ्यास करायचा आणि सायंकाळी पुन्हा एका बेकरी व्यावसायिकाकडे काम करायचे. एवढे कष्टाचे काम करूनही त्याने अभ्यासावरील एकाग्रता ढळू दिली नाही. वार्षिक परीक्षेत मराठी ९६, हिंदी ९१, इंग्रजी ९२, गणित ९५, विज्ञान आणि तंत्रज्ञान ९७ तर समाजशास्त्राला ९६ गुण मिळवून त्याने यश मिळवले. यासाठी त्याला रवळनाथ विद्यालयाचे मुख्याध्यापक व इतर शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y72531 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top