चंदगडला आरोग्य कर्मचाऱ्यांचा सत्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चंदगडला आरोग्य कर्मचाऱ्यांचा सत्कार
चंदगडला आरोग्य कर्मचाऱ्यांचा सत्कार

चंदगडला आरोग्य कर्मचाऱ्यांचा सत्कार

sakal_logo
By

32563
चंदगड : आरोग्य कर्मचाऱ्यांना शाहू पुरस्कार मिळाल्याबद्दल सत्कार करताना डॉ. बी. डी. सोमजाळ.

चंदगडला आरोग्य कर्मचाऱ्यांचा सत्कार
चंदगड : येथील आरोग्य विभागाकडे कार्यरत आरोग्य सहायक रवी पाटील व आरोग्य सेवक वसंत गायकवाड यांना या वर्षीचा जिल्हा परिषदेचा छत्रपती शाहू आदर्श कर्मचारी पुरस्कार मिळाला. त्याबद्दल तालुका आरोग्य अधिकारी डॉ. बी. डी. सोमजाळ यांच्या हस्ते त्यांचा सत्कार झाला. डॉ. सोमजाळ म्हणाले, ‘‘नगरिकांचे आरोग्य चांगले राहिले पाहिजे, हा हेतू ठेवून शासनाच्या प्रत्येक योजना आणि संदेश गाव पातळीवर पोहोचवण्याचे काम पंचायत समितीचे आरोग्य कर्मचारी करतात. कोरोनासारख्या महामारीच्या काळात या विभागाने केलेले काम कौतुकास्पद ठरले. त्याचाच परिणाम म्हणून जिल्हा परिषदेने दखल घेऊन केलेला हा सन्मान कर्मचाऱ्यांचे बळ वाढवणारा आहे.’’ बाळासाहेब सुतार, पुंडलिक नाईक, संदीप पाटील, पांडुरंग मेंगाणे, अब्राहम डिसोझा, आविष्कार नाईक, दीपक नाईक, मंगल नाईक, रंजना साळोखे उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y72533 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..