शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञान व व्यापारी दृष्टीकोनाची गरज | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञान व व्यापारी दृष्टीकोनाची गरज
शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञान व व्यापारी दृष्टीकोनाची गरज

शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञान व व्यापारी दृष्टीकोनाची गरज

sakal_logo
By

32564
------------------------------
शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञान व व्यापारी दृष्टिकोनाची गरज
सूर्यकुमार सावंत-भोसले, माडखोलकर महाविद्यालयात मार्गदर्शन
सकाळ वृत्तसेवा
चंदगड, ता. ३० ः शेती व्यवसाय किफायतशीर ठरण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि व्यापारी दृष्टिकोन महत्त्वाचा आहे, असे मत कानूर (ता. चंदगड) येथील प्रगतिशील शेतकरी सूर्यकुमार सावंत-भोसले यांनी व्यक्त केले. येथील र. भा. माडखोलकर महाविद्यालयात पालक मेळावा व कृषी मार्गदर्शन कार्यक्रमात ते बोलत होते. प्राचार्य डॉ. पी. आर. पाटील अध्यक्षस्थानी होते.
सावंत-भोसले म्हणाले, ‘उत्पादित मालाला बाजारपेठे, दळणवळणाची सुविधा याची माहिती शेतकऱ्याला असणे गरजेचे आहे. शिवाय माती परीक्षण, हवामान याचेही ज्ञान करून घ्यावे लागेल. हवामान बदलाबाबत शेतकऱ्याला अचूक माहिती मिळाली तर त्याचे नुकसान टाळता येईल.’ प्राचार्य डॉ. पाटील म्हणाले, ‘विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानाबरोबरच व्यावहारिक, तसेच व्यावसायिक ज्ञान देण्याचा प्रयत्न महाविद्यालयाकडून सुरू आहे. त्याचाच भाग म्हणून विविध क्षेत्रांतील तज्ज्ञांची व्याख्याने आयोजित केली जात आहेत. पालकांनी आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी नियोजन करावे. महाविद्यालयालाही योग्य सूचना कराव्या.’
प्रा. एस. के. सावंत, डॉ. एम. एम. माने, शिवणगेचे माची सरपंच अरुण पाटील यांनीही मार्गदर्शन केले. प्रा. आर. एस. पाटील, डॉ. एस. एस. सावंत, डॉ. ए. वाय. जाधव, डॉ. जी. वाय. कांबळे, हर्षाली सावंत-भोसले, चेतन शेरेगार उपस्थित होते. डॉ. आर. एन. साळुंखे यांनी प्रास्ताविक केले. प्रा. एस. बी. दिवेकर यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. के. एन. निकम यांनी आभार मानले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y72534 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..