
आजरा कारखान्याचे शेअर्स विक्रीसाठी खुले : प्रा. शिंत्रे
आजरा कारखान्याचे शेअर्स
विक्रीसाठी खुले : प्रा. शिंत्रे
आजरा, ता. २९ : आजरा सहकारी साखर कारखान्याने पाच हजार शेअर्स विक्रीसाठी खुले केले आहेत. उपविधीतील तरतुदीस पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांना व त्याचबरोबर डिस्टिलरी प्रकल्पाकरिता हे शेअर्स खुले केल्याची माहिती प्रसिद्धी पत्रकातून आजरा साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रा. सुनील शिंत्रे यांनी दिली.
कारखाना कार्यक्षेत्रातील रहिवासी, तसेच कारखाना कार्यक्षेत्रात त्यांची स्वतःची किमान वीस गुंठे जमीन व सभासदांसाठी इच्छुक असलेली व्यक्ती सज्ञान असावी. पंधरा हजार शेअर्सपोटी रक्कम भरणे आवश्यक आहे. आजरा कारखाना संचालक मंडळाच्या सहकार्याने अडचणीतून काढला आहे. कारखाना नफ्यात आणण्यासाठी संचालक मंडळ प्रयत्नशील आहे. कारखाना चालवण्यासाठी केवळ साखरचे उत्पादन घेऊन चालणार नाही. डिस्टिलरी प्रकल्प उभारल्यास कारखान्याचे उत्पन्न वाढण्यास मदत होणार आहे. त्याकरिता कार्यक्षेत्रातील सर्व उत्पादक शेतकऱ्यांनी याचा लाभ घेत कारखान्याचे शेअर्स खरेदी करून निधी उभारण्यास मदत करावी. कारखान्याकडे यापूर्वी सभासद असणाऱ्या शेतकऱ्यांनी शेअर्स रक्कम पूर्ण करावी. शासनाने केलेल्या सभासद छाननीमध्ये काही कागदपत्राअभावी तसेच अपुऱ्या रकमेमुळे सभासदत्व रद्द केलेल्या शेतकऱ्यांनी येणेबाकी तसेच कागदाची पूर्तता करावी, असे आवाहन केले आहे. या वेळी उपाध्यक्ष आनंदराव कुलकर्णी, संचालक विष्णुपंत केसरकर, वसंतराव धुरे, सुधीर देसाई, मुकुंदराव देसाई, मधुकर देसाई, दिगंबर देसाई, सुनीता रेडेकर, अॅड. लक्ष्मण गुडुळकर, दशरथ अमृते, जनार्दन टोपले, अनिल फडके, विजयालक्ष्मी देसाई, तानाजी देसाई, कारखान्याचे कार्यकारी संचालक डी. टी. भोसले, सेक्रेटरी व्ही. के. ज्योती उपस्थित होते.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y72573 Txt Kopdist Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..