उद्योजकता मेळावा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

उद्योजकता मेळावा
उद्योजकता मेळावा

उद्योजकता मेळावा

sakal_logo
By

32573/ 32588


उद्योग-व्यवसायातून उन्नती साधा
जिल्हाधिकारी रेखावार; उद्योजक व नवउद्योजकांसाठी मार्गदर्शन कार्यक्रमाला प्रतिसाद.
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ३० : ‘‘तरुण-तरुणींनी उद्योगाकडे वळावे. उद्योग-व्यवसाय उभारून कुटुंबाची आणि जिल्ह्याची उन्नती साधावी. यासाठी कर्जपुरवठा, अन्य ते सर्व सहकार्य प्रशासनातर्फे दिले जाईल’’, अशी ग्वाही जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिली.
जिल्हाधिकारी कार्यालय आणि शासकीय विभागांतर्फे महासैनिक दरबार हॉलमध्ये ‘उद्योजक व नवउद्योजकांसाठी मार्गदर्शन कार्यक्रमाच्या उद्‌घाटनप्रसंगी ते बोलत होते. अल्पसंख्याक विकास महामंडळांतर्गत शैक्षणिक कर्ज मंजुरीचे पत्र रेखावार यांच्या हस्ते लाभार्थ्यांना वितरित केले. उपजिल्हाधिकारी शक्ती कदम, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक गणेश गोडसे, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता केंद्राचे सहायक आयुक्त संजय माळी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगरे, ‘नाबार्ड’चे सहायक महाप्रबंधक (जिल्हा विकास) आशुतोष जाधव, विविध विभाग, महामंडळाचे व्यवस्थापक उपस्थित होते. या वेळी सोळाशे तरुण-तरुणी नवउद्योजकांनी या कार्यक्रमात नोंदणी केली.
रेखावार म्हणाले, ‘‘शासनाच्या विविध योजनांची अंमलबजावणी चांगल्या प्रकारे करण्यात येत असून, आणखी गती देण्याच्या उद्देशाने कार्यक्रमाचे आयोजन केले. सर्व नागरिक, उद्योजक, नवउद्योजकांनी शासनाच्या योजनांचा लाभ घ्यावा. कर्ज पुरवठा योजनांचा लाभ घेऊन औद्योगिक क्षेत्रात प्रगती करा.’’
श्री. माळी यांनी प्रास्ताविक केले. जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक गणेश गोडसे यांनी आभार मानले. जिल्हा अग्रणी बँक, जिल्हा उद्योग केंद्रांसह सर्व महामंडळांच्या वतीने नागरिकांना कर्ज पुरवठ्याच्या योजनांची माहिती देऊन प्रस्ताव सादर करून घेतले.

महिलांची लक्षणीय उपस्थिती
उद्योग व व्यवसायासाठी कर्ज देण्यासाठी अनेक विभागांच्या शासकीय योजनांची माहिती, लाभ नागरिकांना देण्याच्या उद्देशाने हा कार्यक्रम घेतला. कार्यक्रमास तरुण-तरुणी, महिला उद्योजकांसह नवउद्योजक, बचतगटांच्या महिला उपस्थित होत्या. विविध विभागांचे माहिती पत्रक, कर्ज मागणी अर्ज, ऑनलाईन योजनेसाठी संबंधित तपशील, संपूर्ण माहितीसह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y72600 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..