
आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेच्या लाभाचे आवाहन
आंबेडकर कृषी स्वावलंबन
योजनेच्या लाभाचे आवाहन
गडहिंग्लज, ता. २९ : शासनातर्फे अनुसूचित जाती व नवबौद्ध शेतकऱ्यांसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना राबविण्यात येते. या योजनेंतर्गत नवीन विहीर, जुन्या विहिरीच्या दुरुस्तीसह विविध बाबींसाठी अनुदान दिले जाते. अनुसूचित जाती व नवबौद्ध शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
राज्य शासनातर्फे पाच वर्षांपासून ही योजना राबविली जात आहे. नवीन विहिरीसाठी अडीच लाख रुपये, जुन्या विहिरीच्या दुरुस्तीसाठी ५० हजार, इनवेल बोअरिंग २० हजार, पंपसंचासाठी २० हजार, वीज जोडणी १० हजार, शेततळ्याचे अस्तरीकरण एक लाख, ठिबक सिंचन ५० हजार, तुषार सिंचनसाठी २५ हजार रुपयांचे अनुदान दिले जाते. नवीन विहिरीच्या अनुदानासाठी एक एकर शेत जमीन तर अन्य घटकांच्या लाभासाठी अर्धा एकर शेत जमीन असावी अशी अट आहे.
या योजनेच्या लाभासाठी अनुसूचित जाती व नवबौद्ध शेतकऱ्यांनी https://mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करावेत, असे आवाहन गटविकास अधिकारी शरद मगर, कृषी अधिकारी दिनेश शेटे, धर्मराज महाले यांनी प्रसिद्धी पत्रकातून केले आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y72601 Txt Kopdist Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..