जवानावर अंत्यसंस्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जवानावर अंत्यसंस्कार
जवानावर अंत्यसंस्कार

जवानावर अंत्यसंस्कार

sakal_logo
By

३२५९५

साश्रूनयनांनी कागिनकर यांना निरोप
नंदनवाडात अंत्यसंस्कार; पंचक्रोशीतील ग्रामस्थांची गर्दी; सजवलेल्या ट्रॅक्टरमधून अंत्ययात्रा
सकाळ वृत्तसेवा
नूल, ता. २९ : हिमाचल प्रदेशमधील धर्मशाला येथे ड्यूटीवर असताना हृदयविकाराने मृत्यू झालेल्या नंदनवाड (ता. गडहिंग्लज) येथील जवान अविनाश कागिनकर यांच्या पार्थिवावर आज दुपारी साश्रूनयनांनी अंत्यसंस्कार झाले. नंदनवाड ते बसर्गे फाटा रोडवरील गायरानमध्ये तयार केलेल्या चबुतऱ्यावर त्यांच्या मृतदेहाला वडील आप्पा कागिनकर यांनी भडाग्नी दिली. दरम्यान, अंत्ययात्रेत पंचक्रोशीतील ग्रामस्थ सहभागी झाले होते.
हिमाचल प्रदेशमधून रात्री पुण्यात आणि तेथून आज सकाळी कोल्हापूरमार्गे त्यांचा मृतदेह नंदनवाडमध्ये पोहोचला. सोबत सुभेदार राजेंद्रन यांच्यासह कोल्हापूर १०९, इन्फट्रीच्या जवानांचे पथक होते. सकाळी अकराला सजवलेल्या ट्रॅक्टरमधून त्यांची अंत्ययात्रा काढली. अंत्ययात्रेच्या मार्गावर दुतर्फा रांगोळीचा सडा टाकला होता. त्यांच्या घरासमोर अंत्यदर्शनासाठी मृतदेह ठेवला. त्यावेळी पत्नी राजलक्ष्मी, आई सुवर्णा, वडील आप्पा, भाऊ वैभव यांच्यासह नातेवाईकांनी केलेल्या आक्रोशाने उपस्थितांचेही डोळे पाणावले.
सुभेदार राजेंद्रन, प्रांताधिकारी बाबासाहेब वाघमोडे, तहसीलदार दिनेश पारगे, पोलिस निरीक्षक रवींद्र शेळके, उपनिरीक्षक शीतल सिसाळ, जिल्हा सैनिक बोर्डाचे अध्यक्ष चंद्रशेखर पांगे, सैनिक कल्याण संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष सदाशिव घेवडे, रवी मंडलिक, रियाज शमनजी, बाळेश नाईक, विद्याधर गुरबे, संतोष पाटील, रेखा हत्तरकी, गंगाधर व्हसकोटी, नंदनवाडच्या सरपंच शेवंता मगदूम, मनसे शाखाप्रमुख नागेश चौगुले, गडहिंग्लज तालुका सैनिक संघटनेचे अध्यक्ष कुमार पाटील, मंडल अधिकारी कामत यांनी आदरांजली वाहिली.
अंत्यविधीनंतर वडील आप्पा कागिनकर यांच्याकडे सैन्यदलाकडून भारताचा ध्वज सुपूर्द केला. श्री. पारगे, बाळेश नाईक, पुष्पा वाघराळकर यांनी शोक व्यक्त केला. बसर्गेच्या सरपंच भारती रायमाने, उपसरपंच बसवराज कापसे, नौकूडचे सरपंच शुक्राचार्य चोथे, नंदनवाड उपसरपंच बाबू केसरकर, दीपक पुजारी, येणेचवंडीचे सरपंच भारत झळके उपस्थित होते. आनंदा वाघराळकर, राजेश चव्हाण, एस. बी. पाटील यांनी सूत्रसंचालन केले.
यावेळी महागाव, नेसरी, करंबळी, बसर्गे, अर्जुनवाडी, तेरणी येथील आजी-माजी सैनिक संघटनेचे पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y72616 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..