परीक्षा कशी, विद्यार्थ्यांना हवी तशी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

परीक्षा कशी, विद्यार्थ्यांना हवी तशी
परीक्षा कशी, विद्यार्थ्यांना हवी तशी

परीक्षा कशी, विद्यार्थ्यांना हवी तशी

sakal_logo
By

परीक्षा कशी; विद्यार्थ्यांना हवी तशी!
संघटनांचा दबाव; एमसीक्यूच्या निर्णयावर शैक्षणिकसह सार्वत्रिक टीका
ओंकार धर्माधिकारी ः सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २९ ः शिवाजी विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाने उन्हाळी सत्रातील परीक्षा एससीक्यू (बहुपर्यायी) स्वरूपाच्या प्रश्नपत्रिकेच्या आधारे घेण्याचा निर्णय घेतला. यामुळे विद्यार्थ्यांच्या आकलनाचे संपूर्ण मूल्यमापन होणार नसल्याने या निर्णयावर टीका होत आहे. विद्यार्थी संघटनांचा अनाठायी आग्रह, विद्या परिषदेतील सदस्यांची डळमळीत भूमिका आणि अधिसभा सदस्यांचे सूचक मौन यामुळे हा निर्णय घेतला गेल्याचे दिसते. हा निर्णय विद्यार्थ्यांच्या अहिताचा आहे.
कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांमधील अटींमुळे विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रात येऊन परीक्षा देणे शक्य नव्हते. त्यामुळे ऑनलाईन परीक्षा घेतल्या. अपरिहार्यतेमुळे ही परीक्षा बहुपर्यायी स्वरुपामध्ये घेतली. चालू शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांचे नियम शिथिल केले. महाविद्यालये सुरू झाली. वर्गांमध्ये अध्यापनही झाले पण ऐन परीक्षेच्या आधी विद्यार्थ्यांनी संघटनांच्या माध्यमातून परीक्षा ऑफलाईन पण बहुपर्यायी स्वरूपाच्या घ्याव्यात अशी मागणी केली. त्यासाठी आंदलने झाली. त्यानंतर विद्या परिषदेच्या बैठकीत याबाबत चर्चा करून बहुपर्यायी प्रश्नपत्रिकेचा निर्णय घेतला. परीक्षा व मूल्यमापन मंडळाने याबाबतचे आदेश महाविद्यालयांना दिले. विद्यापीठाच्या या निर्णयावर सार्वत्रिक टीका होत आहे. याचे कारण बहुपर्यायी स्वरुपाच्या प्रश्नपत्रिकेत विद्यार्थ्यांना लघुत्तरी प्रश्न असतात. त्यामुळे त्यांचे आकलन, मांडणी, भाषा सौंदर्य, तर्क यचे मूल्यमापन करता येत नाही. विद्यार्थ्याला विषयाचे किती ज्ञान आहे. त्याचा दृष्टिकोन काय आहे हेदेखील समजत नाही. भाषा आणि मानव्यशास्त्राशी निगडित विषयांची बहुपर्यायी प्रश्नपत्रिकेतून त्रोटक चाचणीच होऊ शकते. बहुपर्यायी प्रश्नपत्रिकेच्या आधारे परीक्षा घेणे म्हणजे केवळ औपचारिकता पूर्ण केल्यासारखे आहे, असे मत शिक्षणतज्ज्ञ व्यक्त करतात.

निर्णय दबावाखाली
राजकीय विद्यार्थी संघटनांनी घेतलेली भूमिका अनाठायी आहे. एस.टी. संप, ऑनलाईन अध्यापन ही कारणे योग्य नाहीत. कारण पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याने महाविद्यालयातील अध्यायनाबरोबरच स्वयंअध्यायन करणे अपेक्षित आहे. त्यामुळे वरील कारणे अत्यंत बाळबोध आहेत. राजकीय विद्यार्थी संघटांचा दबाव विद्यापीठ प्रशासनाने घेण्याचे कारणच काय? परीक्षा कशी घ्यायची व तिचे स्वरूप कसे असावे हे ठरवण्याची सुविधा विद्यार्थ्यांना आहे का? एकूणच बहुपर्यायी स्वरुपाच्या प्रश्नपत्रिकेचा आग्रह संघटना का धरत आहेत हे उघड आहे. मात्र त्याचा विद्यार्थ्यांना भविष्यात त्याचा तोटा होणार हे नक्की आहे.

अधिसभा सदस्यांचे सूचक मौन
विद्यापीठ अधिसभा सदस्यांनी परीक्षेच्या विषयावर बोलणे आवश्यक होते. पण विकास आघाडी आणि विद्यापीठ विकास मंच दोन्ही संघटनांच्या सदस्यांनी याबाबत मौन बाळगले. त्यामुळे या भूमिकेच्या विरोधात एकाचाही आवाज उठला नाही. सुटासारख्या संघटनाही यावेळी गप्पच होत्या.

राजकीय हस्तक्षेपाची चर्चा
विद्यापीठाची परीक्षा बहुपर्यायी स्वरुपाची घ्या अशी मागणी करणाऱ्या विद्यार्थी संघटना या राजकीय पक्षांशी निगडीत होत्या. त्यामुळे राजकीय दबावातून हा निर्णय झाला असवा अशी चर्चा विद्यापीठातील प्राध्याक, कर्मचारी यांच्यात सुरू आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y72620 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top