हॉटेल मॅनेजमेंट करीयर मार्गदर्शन संपन्न | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

हॉटेल मॅनेजमेंट करीयर मार्गदर्शन संपन्न
हॉटेल मॅनेजमेंट करीयर मार्गदर्शन संपन्न

हॉटेल मॅनेजमेंट करीयर मार्गदर्शन संपन्न

sakal_logo
By

हॉटेल मॅनेजमेंट करीयरवर मार्गदर्शन
कोल्हापूर : श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूर संचालित डॉ. बापूजी साळुंखे इस्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंटतर्फे या क्षेत्रातील करिअर मार्गदर्शन व प्रात्यक्षिक सेमिनार झाला. उद्‍घाटन इन्स्टिट्यूटचे संचालक धनराज भोसले यांच्या हस्ते झाले. भोसले यांनी मार्गदर्शन केले. संदीप माळी, राजेश शिर्के यांनी भारतामधील ५६ हॉटेल्स तसेच गल्फ देशात असणाऱ्या ४० हॉटेल्समध्ये २०० हून अधिक लोकांची ट्रेनिंग व नोकरीसाठी आवश्यकता असल्याचे सांगितले. स्मिता शिंदे, जयदीप पोवार यांनी मोठ्या प्रमाणात नोकरीसाठी संधी असल्याचे सांगितले. या वेळी विविध करार करण्यात आले. मुंबई, पुणे, बंगळुरू व गोवा येथील पंचतारांकित हॉटेल्समध्ये अनेक विद्यार्थी कार्यरत आहेत. कौस्तुभ देसाई याने मार्गदर्शन केले. मास्टर शेफ राजेंद्र तनपुरे, शेफ करण चिंचलीकर, शेफ शैलेश राऊत, आकाश पाटील, अस्मिता पाटील, निरंजल देसाई, एकता मुळे, ऋषिकेश भोसले, शेफ के. डी. यांनी विविध प्रात्यक्षिके करून दाखवली. संस्थेचे कार्याध्यक्ष अभयकुमार साळुंखे, सचिव शुभांगी गावडे, सीईओ कौस्तुभ गावडे उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y72682 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..