घरफाळा वाढीच्या अपिलांवर सुनावणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

घरफाळा वाढीच्या अपिलांवर सुनावणी
घरफाळा वाढीच्या अपिलांवर सुनावणी

घरफाळा वाढीच्या अपिलांवर सुनावणी

sakal_logo
By

घरफाळा वाढीच्या
अपिलांवर सुनावणी
इचलकरंजी : पालिकेने वाढवलेल्या १० टक्के वाढीव घरफाळ्यावर दाखल झालेल्या अपिलावर आज सुनावणी झाली. १३७ अपील दाखल होती. पालिका सभागृहात आज याबाबतची सुनावणी घेतली. चतुर्थ वार्षिक कर आकारणी अंतर्गत पालिकेने १० टक्के घरफाळा वाढ केला होता. त्या विरोधात सुमारे चार हजारहून हरकती दाखल केल्या होत्या. त्यावर सुनावणी होऊन सर्व हरकती फेटाळून लावत घरफाळा वाढ कायम केली होती. त्यानंतर १३७ मिळकतधारकांनी अपील केले होते. त्यावर आज सुनावणी ठेवली होती. प्रांताधिकारी विकास खरात, सहायक संचालक (नगररचना विभाग, सातारा) व मुख्याधिकारी डॉ. प्रदीप ठेंगल यांच्या उपस्‍थितीत सुनावणी झाली. दिवसभरात सर्व अपिलांवर सुनावणी घेण्यात आली.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y72713 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..