निधन वृत्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

निधन वृत्त
निधन वृत्त

निधन वृत्त

sakal_logo
By

32664
उमा गावडे
कोल्हापूर : नाईक मळा, न्यू पॅलेस येथील सौ. उमा गावडे-देशमुख (वय ५४) यांचे निधन झाले. कोल्हापूरचे प्रथम महापौर (कै.) बाबासाहेब कसबेकर यांच्या त्या कन्या होत; तर दि कमर्शियल को-ऑपरेटिव्ह बँकेचे संचालक अरुण गावडे-देशमुख यांच्या त्या पत्नी होत. त्यांच्या मागे पती, मुलगी, मुलगा, सून, जावई असा परिवार आहे. रक्षाविसर्जन गुरुवारी (ता. ३०) आहे.

32667
सुमन कदम
कोल्हापूर : रंकाळा रोड येथील श्रीमती सुमन जयवंतराव कदम (जामदार) (वय ७५) यांचे निधन झाले. रक्षाविसर्जन गुरुवारी (ता. ३०) आहे.

02841
पांडुरंग तोरस्कर
उत्तूर ः बेलेवाडी हुबळगी (ता. आजरा) येथील सार्वजनिक बांधकाम खात्याचे निवृत कर्मचारी पांडुरंग कृष्णा तोरस्कर (वय ६९) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुली, एक मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे.

00628
सूरगोंडा पाटील
दानोळी ः निमशिरगाव येथील सूरगोंडा रामगोंडा पाटील (वय ८९) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. ते निमशिरगाव विविध कार्यकारी सोसायटीचे माजी उपाध्यक्ष होते. माजी उपसरपंच सुदर्शन पाटील यांचे वडील होत. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, तीन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन गुरुवारी (ता. ३०) निमशिरगाव येथे आहे.

32693
विमल माने
इचलकरंजी : बुबनाळ (ता. शिरोळ) येथील सौ. विमल नानासो माने ( वय ६७) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पती, तीन मुली, मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे.

01586
अमर हातकर
नानीबाई चिखली ः येथील तरुण प्रगतशील शेतकरी अमर बाबूराव हातकर (वय ३३) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे आई, पत्नी, मुलगी, मुलगा तसेच तीन विवाहित बहिणी आहेत. रक्षाविसर्जन गुरुवारी (ता. ३०) आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y72749 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top