कोरोना वाढ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोरोना वाढ
कोरोना वाढ

कोरोना वाढ

sakal_logo
By

जिल्ह्यात कोरोनाचे
दिवसात १४ रुग्ण
उपचारार्थी ६० वर; सर्वाधिक रुग्ण शहरात
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २९ ः जिल्ह्यात आज एका दिवसात १४ नवे कोरोनाबाधित सापडले आहेत. यात शहरातील सर्वाधिक म्हणजे ९ जणांचा समावेश आहे. सर्वांना सौम्य लक्षणे आहेत. त्यामुळे घरीच उपचार होणार आहेत. जिल्ह्यातील बाधितांची संख्या ६० झाली आहे.
महिनाभरात राज्यातील काही शहरात बाधितांची संख्या वाढू लागली. तेव्हा कोल्हापुरात कोरोनाची बाधितांची संख्या कमी होती, मात्र गेल्या दहा दिवसांत येथे पुन्हा कोरोनाबाधितांची संख्या एक-दोन दिवस आडाने वाढत आहे. या नव्याने ज्या व्यक्ती बाधित सापडत आहेत. त्यातील बहुतांशी व्यक्ती सौम्य लक्षणाच्या आहेत. त्यामुळे चार दिवसांच्या उपचारानंतर त्या कोरोनामुक्त होत आहेत.
जिल्ह्यातील कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत ३१ लाख व्यक्तींचे लसीकरण झाले. अद्याप सव्वालाख व्यक्ती कोरोना प्रतिबंधक लस घेतलेली नाही. अशांचा शोध घेऊन त्यांनाही लसीकरण सुरू आहे. त्यानुसार रोज जिल्ह्यात २०० ते ५०० लसीकरण होत आहे. त्यासाठी सर्व शासकीय रुग्णालयांत लसचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. ज्यांनी लस घेतलेल्या नाहीत, अशांना तातडीने लस देण्याची सूचना जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ. फारुक देसाई यांनी केल्या आहेत.
ज्यांचे वय साठपेक्षा अधिक आहे, तसेच त्यांना गंभीर आजारांची लक्षणे आहेत, अशा व्यक्तींना बूस्टर डोस देण्यात येत आहेत. बूस्टर डोस न घेतलेल्या व्यक्ती बाधित होण्याची शक्यता आहे. गंभीर आजारी असताना कोरोना झाल्याचे आढळल्यास रुग्णालयात दाखल व्हावे लागते. त्यामुळे अशा व्याधीग्रस्तांनी जास्त खबरदारी घेण्याचा सल्ला शासकीय वैद्यकीय यंत्रणेकडून देण्यात येत आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y72774 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top