घरफाळा वसुली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

घरफाळा वसुली
घरफाळा वसुली

घरफाळा वसुली

sakal_logo
By

२ दिवसांत घरफाळ्याचे
६ कोटी ८२ लाख जमा

कोल्हापूर, ता. २९ : घरफाळा विभागाच्या जूनअखेरच्या ६ टक्के सवलत योजनेतून दोन दिवसांत महापालिकेच्या नागरी सुविधा केंद्र व ऑनलाईनद्वारे ६ कोटी ८२ लाख २४ हजार रुपये जमा झाले.
यंदाचा घरफाळा एकरकमी भरणाऱ्यांना ३० जूनअखेर ६ टक्के सवलत दिली आहे. त्याला प्रतिसाद देत बुधवारअखेर ४१३३४ करदात्यांनी २४ कोटी ४ लाख ५० हजारांचा भरणा केला. मंगळवार व बुधवार अशा दोन दिवसांत ६ कोटी ८२ लाख २४ हजार १० रुपये जमा झाले. बुधवारी २ कोटी १२ लाख ३७ हजार १२८ रुपये जमा झाले. ऑनलाईन ७० लाख रुपये जमा झाले. गुरुवार (३० जून) योजनेचा शेवटचा दिवस आहे. सर्व नागरी सुविधा केंद्रे सायंकाळी सातपर्यंत सुरू राहणार आहेत. १ जुलै ते ३० सप्टेंबर अखेर करदात्यांना ४ टक्के सवलत दिली जाणार आहे. १ ऑक्टोबर ते ३१ डिसेंबरअखेर २ टक्के सवलत दिली जाणार आहे. ६ टक्के सवलत योजनेचा जास्तीत जास्त करदात्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी केले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y72775 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top