सिंधुदुर्ग-गोवा सीमेवर अलर्ट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सिंधुदुर्ग-गोवा सीमेवर अलर्ट
सिंधुदुर्ग-गोवा सीमेवर अलर्ट

सिंधुदुर्ग-गोवा सीमेवर अलर्ट

sakal_logo
By

३२६७८
पत्रादेवी ः येथील पोलिस तपासणी नाक्यावर बुधवारी तपासणी सुरू झाल्यामुळे सायंकाळी लागलेल्या वाहनांच्या रांगा.
३२६७९
पत्रादेवी ः येथे नाक्यावर बुधवारी गोवा पोलिसांनी ठेवलेला बंदोबस्त. (छायाचित्रे - नीलेश मोरजकर)

सिंधुदुर्ग-गोवा सीमेवर अलर्ट
बंदोबस्तात वाढ; प्रत्येक गाडीची कसून तपासणी
सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. २९ ः एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बंड केलेल्या आमदार व मंत्र्यांचा गट रात्री उशिरा गोव्यात दाखल होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर गोवा शासनाने विशेष सुरक्षा तैनात केली आहे. शिवसैनिक गोव्यात येण्याची शक्यता गृहीत धरून महाराष्ट्र-गोवा सीमेवर पत्रादेवी पोलिस तपासणी नाक्यावरही कडक बंदोबस्त ठेवला आहे. राज्यातून जाणाऱ्या प्रत्येक वाहनांची व प्रवाशांची कसून चौकशी करूनच गोव्यात प्रवेश देण्यात येत आहे.
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी महाविकास आघाडीला उद्या गुरुवारी (ता.३०) विधानसभेत बहुमत सिद्ध करण्यासाठी सांगितले आहे. या विश्वासदर्शक ठरावासाठी बंडखोर आमदारांचा गट उपस्थित राहणार आहे. आज सायंकाळी उशिरा आसामदेखील गुवाहाटी येथून बंडखोर आमदारांचा गट गोव्यात येण्यासाठी निघाला असून, रात्री उशिरा आमदारांचा गट दाभोळी विमानतळावर उतरणार आहे. या आमदारांना दोनापावला येथील पंचतारांकित ताज कॅन्वेन्शन सेंटर हॉटेलमध्ये ठेवण्यात येणार आहे. बंडखोर आमदारांच्या सुरक्षेची पूर्ण जबाबदारी गोवा शासनाने घेतली असून, दाबोळी विमानतळपासून ताज हॉटेलच्या परिसरात मोठ्या प्रमाणात बंदोबस्त तैनात केला आहे. आज रात्री गोव्यात मुक्काम करून सकाळी आमदारांचा गट विश्वासदर्शक ठरावासाठी थेट मुंबईला रवाना होणार आहे.

पत्रादेवी नाक्यावर कडक बंदोबस्त
एकनाथ शिंदे यांच्यासह इतरांनी बंडखोरी केल्याने राज्यात शिवसैनिकांत संतप्त भावना आहेत. सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकर यांनीही बंडखोरी केल्याने शिवसैनिक त्यांच्या निषेधार्थ रस्त्यावर उतरले होते. त्यामुळे बंडखोर आमदारांचा गट गोव्यात आल्यावर शिवसैनिकांनी सीमेवरून गोव्यात येऊन आंदोलन करू नये, यासाठी गोवा पोलिस तपासणी नाक्यावर अलर्ट असल्याचे दिसले. राज्यातून गोव्यात येणाऱ्या प्रत्येक वाहनांची कसून तपासणी करण्यात येत आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y72776 Txt Kolhapur1

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..