
वीज चोरी गुन्हा
वीजचोरी प्रकरणी
दोन गुन्हे दाखल
कोल्हापूर, ता. १ : येथील इचलकरंजी (ता. हातकणंगले) व गिरगाव (ता. करवीर) येथील दोन वीज ग्राहकांनी (लघुदाब वीज जोडणी) मीटरमध्ये फेरफार करून १४ लाख ९३ हजारांची वीजचोरी केली. याप्रकरणी महावितरणने मारुती बाबूराव चौगुले, बाबू शिवयोगी चौगुले, विजय चौगले यांच्या विरुद्ध जुना राजवाडा पोलिस ठाण्यात वीजचोरीचा गुन्हा दाखल केला. इचलकरंजी येथील बाबू चौगुले व मारुती चौगुले यांच्या वीज मीटरची भरारी पथकाने तपासणी केली. यात फेरफार केल्याचे दिसून आले. गिरगाव (ता. करवीर) येथील विजय चौगले (लघुदाब औद्योगिक वीज ग्राहक) यांच्याही मीटरमध्ये फेरफार केल्याचे आढळले. कारवाईत महावितरणच्या भरारी पथकाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता राकेश मगर, सहाय्यक अभियंता नितीन जोशी, सहाय्यक सुरक्षा व अंमलबजावणी अधिकारी वर्षा जाधव, वरिष्ठ तंत्रज्ञ राजेंद्र कोरवी, निखिल कांबळे यांनी सहभाग घेतला.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y72818 Txt Kolhapur
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..