
कागल : जादूटोणा - चौघा विरुद्ध गुन्हा
‘जादूटोणा’नुसार
चौघांविरोधात
गुन्हा दाखल
कागल, ता. २९ : जादूटोणाविरोधी कायद्यांतर्गत सिद्धनेर्ली (ता. कागल) येथील चौघांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला. सविता पाटील, कृष्णा भोसले, बाजीराव लोहार (राशिवडे), बाळू मगदूम अशी त्यांची नावे आहेत. याबाबतची फिर्याद अंनिसच्या कोल्हापूरचे जिल्हा प्रधान सचिव सचिन शंकर सुतार (लक्ष्मीनगर, निढोरी ता. कागल) यांनी दिली आहे.
याबाबत कागल पोलिसांनी दिलेली माहिती अशी ः जादूटोणा, पिशाच्च व अघोरी प्रथेनुसार लोकांच्या समस्या निवारण करतो, असे सांगून लोकांचे शोषण करत आहेत. त्यासाठी अघोरी प्रकार करतात. कोबंडा बळी द्या, तुमच्या समस्या दूर होतील, असे सिद्धनेर्ली परिसरातील लोकांना सांगून अघोरी प्रथा करण्यास सांगतात. दर गुरुवारी असा प्रकार चालत आहे, अशी फिर्याद अंनिसच्या कोल्हापूर शाखेतर्फे देण्यात आली. त्यानुसार हा गुन्हा नोंद केला. दरम्यान, सिद्धनेर्ली येथे भोंदूगिरीचा धंदा तेजीत आहे. त्या भोंदूविरोधात जादूटोणाविरोधी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करा, अशा मागणीचे निवेदन समितीच्या कार्यकर्त्यांनी कागलचे पोलिस निरीक्षक अजितकुमार जाधव यांना दिले. यावेळी सहायक पोलिस निरीक्षक दीपक वाकचौरे उपस्थित होते. निवेदनावर कागल तालुका समितीचे अध्यक्ष सदाशिव निकम, कार्याध्यक्ष कपिल पाटील, प्रधान सचिव हरी आवळे, शहाजी गायकवाड, विजय कुरणे, भीमराव कांबळे, मधुकर येवलुजे आदींच्या सह्या आहेत.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y72822 Txt Kolhapur1
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..