
शिंदे इंजिनिअरिंगच्या नऊ विद्यार्थ्यांची निवड
32705
भडगाव : डॉ. ए. डी. शिंदे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये झालेल्या कॅम्पस इंटरव्ह्यूमधून निवड झालेल्या विद्यार्थ्यांसमवेत मार्गदर्शक प्राध्यापक.
शिंदे इंजिनिअरिंगच्या
नऊ विद्यार्थ्यांची निवड
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. १ : भडगाव (ता. गडहिंग्लज) येथील डॉ. ए. डी. शिंदे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या नऊ विद्यार्थ्यांची कॅम्पस इंटरव्ह्यूमधून निवड झाली. मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागाच्या तिसऱ्या वर्षाचे हे विद्यार्थी आहेत. गोल्ड प्लस फ्लोट ग्लास इंडिया (दिल्ली) या नामांकित कंपनीत त्यांची निवड झाली आहे.
डॉ. ए. डी. शिंदे कॉलेजमध्ये कॅम्पस इंटरव्ह्यू झाल्या. गोल्ड प्लसच्या एचआर अॅडमीन अश्विनीकुमार सिंग दिल्लीहून या इंटरव्ह्यूसाठी आल्या होत्या. त्यांनी विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेतल्या. कर्नाटकातील कणंगला औद्योगिक वसाहतीत या कंपनीचा आशियातील सर्वात मोठा काच निर्मितीचा कारखाना होणार आहे. कंपनीच्या धोरणानुसार स्थानिक मनुष्यबळाला वाव देण्यासाठी शिंदे कॉलेजवर कॅम्पस इंटरव्ह्यू घेतल्या.
या मुलाखतीतून मायाप्पा पाटील, रोहित गायकवाड, आदर्श कांबळे, निरांजन चौगुले, शिवराज चौगुले, ज्ञानेश्वर वाघे, अमोल पाटील, सिद्धेश नाडगौडा, ओमकार शिंदे या विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. संस्थेचे अध्यक्ष अॅड. श्रीपतराव शिंदे, सचिव प्रा. स्वाती कोरी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. कॅम्पस प्रक्रियेसाठी समन्वयक प्रा. किशोर जोशी, साजित सोलापुरे यांचे सहकार्य मिळाले.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y72855 Txt Kopdist Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..