आंबेडकरी चळवळीतील संघटनांचा मेळावा उत्साहात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आंबेडकरी चळवळीतील संघटनांचा मेळावा उत्साहात
आंबेडकरी चळवळीतील संघटनांचा मेळावा उत्साहात

आंबेडकरी चळवळीतील संघटनांचा मेळावा उत्साहात

sakal_logo
By

आंबेडकरी चळवळीतील
संघटनांचा मेळावा उत्साहात
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. ३० : गडहिंग्लज, आजरा व चंदगड तालुक्यांतील आंबेडकरी चळवळीतील संघटनांचा एकदिवसीय मेळावा हुनगिनहाळ (ता. गडहिंग्लज) येथील बुद्ध विहारमध्ये उत्साहात झाला. रिपाईचे ज्येष्ठ नेते मलाप्पा कांबळे अध्यक्षस्थानी होते. ग्रामीण भागातून आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. मेळाव्यात दलित महासंघाचे माजी जिल्हाध्यक्ष प्रकाश कांबळे यांचे राजकारणातील जाती आरक्षण अपेक्षा व वास्तव, या विषयावर व्याख्यान झाले.
भीमशक्तीचे जिल्हा उपाध्यक्ष परशुराम कांबळे मेळाव्याचे निमंत्रक होते. भगवान गौतम बुद्ध, छत्रपती शाहू महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन रिपाईचे तालुकाध्यक्ष दिलीप कांबळे, वंचितचे तालुकाध्यक्ष अर्जुन दुंडगेकर, भीमशक्तीचे तालुकाध्यक्ष भीमराव मोहिते, एस. आर. कांबळे, जी. पी. कांबळे, रूपाली कांबळे, महादेव मगदूम, कल्पना कांबळे यांच्या हस्ते झाले. मलाप्पा कांबळे यांनी संघटनांचे स्नेहमेळावे विभागवार घेऊन आंबेडकरी विचारांची चळवळ सुरू ठेवण्याचे आवाहन केले. परशुराम कांबळे यांनी स्वागत केले. दिलीप कांबळे, एस. आर. कांबळे, जी. पी. कांबळे, अशोक कांबळे, अशोक विटेकरी, देवी मगदूम, रूपाली कांबळे, प्रीती कांबळे, पी. आर. मोहिते यांची भाषणे झाली. शिवगोंड कांबळे, गोविंद रामनाईक, शंकर कांबळे, दिगंबर विटेकरी, भारत कांबळे, कपिल कांबळे, प्रशांत कांबळे, स्वयंम कांबळे, संकेत कांबळे आदी उपस्थित होते. भीमशक्तीचे तालुका युवा अध्यक्ष दयानंद कांबळे यांनी आभार मानले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y72894 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..