इचलकरंजीतील वैद्यकीय क्षेत्राची गरुडभरारी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

इचलकरंजीतील वैद्यकीय क्षेत्राची गरुडभरारी
इचलकरंजीतील वैद्यकीय क्षेत्राची गरुडभरारी

इचलकरंजीतील वैद्यकीय क्षेत्राची गरुडभरारी

sakal_logo
By

डोके ः डॉक्टर डे शुभेच्छा विशेष
------------

इचलकरंजीतील वैद्यकीय क्षेत्राची गरुडभरारी

काही वर्षात वैद्यकीय क्षेत्रात मोठी प्रगती झाली आहे. त्यामुळे मानवाचे जीवन अधिक सुसह्य होऊन त्यांचे जीवनमान वाढले आहे. अत्याधुनिक मशिनरीच्या साहाय्याने अत्यंत गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया करणे आता सुलभ होत आहे. वस्त्रोद्योगाचे माहेरघर असलेल्या इचलकरंजी शहरात आता वैद्यकीय क्षेत्र उत्तुंग भरारी घेत आहे. शहरात वैद्यकीय क्षेत्रातील अत्याधुनिक सुविधा हळूहळू उपलब्ध होत असल्याने सामाजिक आरोग्य अधिक सदृढ बनत चालले आहे. दुसरीकडे या क्षेत्रातील सेवाभावी वृत्तीमळे रुग्णांनाही दिलासा मिळत आहे. एकूणच वैद्यकीय क्षेत्राचा मोठा आधार सर्वच प्रकाराच्या रुग्णांना मिळत असल्याचे दिलासादायक चित्र वस्त्रनगरीत पहावयास मिळत आहे.

-------
इचलकरंजी शहराला संस्थान काळापासूनच वैद्यकीय सुविधांची परंपरा आहे. सध्या हातकणंगले, शिरोळ, कागल तालुक्यासह सीमा भागातील अनेक गावांचा समावेश इचलकरंजी संस्थांनामध्ये होता. साहजिकच संस्थानीक असलेल्या शहरामध्ये आरोग्याच्या सुविधा उपलब्ध होत्या. येथे चांगल्या आरोग्य सुविधा मिळाव्यात संस्थानिकांनीही विविध प्रयत्न केले होते. त्यातूनच केईएम रुग्णालय शहरात साकारले. कोणतीही दुर्घटना घडली किंवा साथीचे आजार पसरले तर हक्काचा सरकारी दवाखाना म्हणून या रुग्णालयांकडे रुग्ण येत असत. हळूहळू पालिकेचे रुग्णालय अपुरे पडू लागल्यानंतर शहरात भव्य रुग्णालय उभा करण्याचा संकल्प दोन दशकांपूर्वी पालिकेतील सत्ताधाऱ्‍यांनी घेतला. त्यातून अनेक संकटांना तोंड देत पालिकेचे ‘आयजीएम’ रुग्णालय सध्या साकारले.
शहराबरोबरच परिसरातील ग्रामीण भाग ते कर्नाटकातील काही गावातील नागरिकांना मोठा आधार असणारे हे रुग्णालय आहे. सुमारे दोनशे बेडची क्षमता असणारे हे रुग्णालय गरिबांसाठी वरदान ठरले. मात्र येथे आधुनिक सुविधा देण्यास अनेक तांत्रिक व शासकीय अडचणी येऊ लागल्या. त्यावर मात करीत या रुग्णालयाकडील वैद्यकीय तज्‍ज्ञ रुग्णांना चांगल्या प्रकारची सेवा देण्यासाठी सातत्याने प्रयत्न केला. त्यामुळे हे रुग्णालय अनेकांना जीवनदान देणारे ठरले. त्यानंतर मात्र या रुग्णालय व्यवस्थापनाचा पसारा पालिकेला सांभाळणे अशक्य होत गेले. त्यातून हे रुग्णालय शासनाकडे हस्तांतरित केले. अनेक संकटांतून पुढे जात असलेले हे रुग्णालय कोविडमध्ये सर्वसामान्य रुग्णांना मोठे आधार ठरले होते. या रुग्णालयाकडील वैद्यकीय व अन्य कर्मचाऱ्यांनी प्रतिकूल परिस्‍थितीत दिलेली सेवा गौरवास्पद आहे.
शहरात अनेक नामवंत तज्‍ज्ञ डॉक्टर आहेत. त्यांची ख्यातीही दूरवरच्या गावात आहे. मात्र त्यांना सर्वच अत्याधुनिक सुविधा देणे शक्य नव्हते. शहर किंवा परिसरातील रुग्ण गंभीर झाल्यास त्यास सांगली, मिरज किंवा कोल्हापूर या शहराकडे नेले जात आहे. अनेक रुग्ण वेळेच उपचार न झाल्याने दगावत असत. यातूनच पॉलिक्लिनिकची संकल्पना पुढे आली. यातूनच अनेक रुग्णालयांची निर्मिती खाजगी तत्त्‍वावर केली. ही रुग्णालये केवळ शहरालाच नव्हे, तर सीमा भागातील अनेक गावांना आणि परिसरातील खेड्या-पाड्यांना दिलासा देणारी ठरली आहेत. येथे सशुल्क सर्व प्रकारच्या आजारांवर सुविधा मिळत आहेत.
एका रुग्णांवर उपचार करताना अनेक तज्‍ज्ञ डॉक्टर एकत्र येऊ लागले. त्यामुळे रुग्णांवर उपचार करणे अधिक सुसह्य झाले. यातून अनेक गुंतागुंतीचे व गंभीर आजारावरही यशस्वी उपचार होऊ लागले. यामुळे रुग्णांच्या आधुनिक उपचाराबरोबरच त्यांच्या नातेवाईकांची होणारी धावपळही थांबली. शहरातील अशा नामवंत डॉक्टरांनी उचलेले धाडसाचे पाऊल आज शहराचे आरोग्य अधिक सदृढ करण्यासाठी महत्त्‍वाचे ठरले आहे. एकाच छताखाली सुपर स्पेशालिटी असणारी रुग्णालये शहरात उभी राहिली आहेत. त्यामुळे अधिक चांगल्या आरोग्याच्या सुविधा मिळत आहेत.
आजही चांगल्या क्षमतेने सुरू असणारी ही रुग्णालये अनेक उपचारांच्या बाबतीत नावलौकिक करणारी ठरली आहेत. याबरोबरच शहरातील अनेक डॉक्टरांनी आपल्या अनुभवाच्या जोरावर दूरवर नावलौकिक प्राप्त केला आहे. हे डॉक्टर रुग्णांच्या व त्यांच्या नातेवाईकांच्या विश्‍वासास पात्र ठरले आहेत. याचबरोबर वैद्यकीय व्यवसायाशी संबंधित अन्य सुविधाही येथे उपलब्ध झाल्या आहेत. शहरातील रुग्णांना पूर्वी रक्ताची गरज भासल्यास कोल्हापूर किंवा सांगली येथे जावे लागत असे. ही धावपळ लक्षात घेऊन शहरातील त्या काळातील काही ज्येष्ठ डॉक्टरांनी एकत्र येऊन येथे रक्तपेढीची आवश्यकता असल्याचे निदर्शनास आणून दिले. लायन्स क्लबने ही गरज लक्षात घेऊन त्यामध्ये पुढाकार घेतला. त्यानंतर शहरात लायन्स ब्लड बँकेची रक्तपेढीची स्वतंत्र इमारत साकारली आहे.
रुग्णांच्या आजाराचे निदान वेळेत होणे महत्त्‍वाचे आहे. त्यामध्ये प्रचंड प्रगती झाली आहे. त्यानुसार शहरात एक्सरे पासून ते एमआरआय स्कॅनिंगपर्यंच्या सर्व सुविधा शहरात उपलब्ध आहेत. तीस वर्षांपासून एकच एक्सरे काढण्याचे ठिकाण होते. आज अनेक ठिकाणी याची सुविधा आहे. विविध आजारांवर उपचार करण्यापूर्वी काही तपासण्या आवश्यक असतात. त्यादृष्टीने आवश्यक असणाऱ्‍या पॅथॉलॉजी लॅबची संख्या शहरात मोठ्या प्रमाणात आहे. येथे अनेक महत्त्‍वाच्या अचूक तपासण्या केल्या जात आहेत. सोनोग्राफीसारखी सुविधा शहरात एक-दोन ठिकाणीच उपलब्ध होती. त्यामुळे रुग्णांची गैरसोय होत होती. आता अनेक ठिकाणी ही सुविधा उपलब्ध झाली आहे. वैद्यकीय सुविधा महाग झाल्या असल्यातरी सामाजिक बांधिलकी जोपासणारे अनेक डॉक्टर्स आज शहरात आहेत. आपापल्या परीने त्यांच्याकडून गरजू रुग्णांना मदत केली जात आहे.
शहरात अलायन्स हॉस्‍पिटल हे मल्‍टिस्पेशालिटी असून येथे अनेक आरोग्याच्या सुविधा उपलब्ध आहेत. येथे नावमंत वैद्यकीय तज्‍ज्ञ सेवा देत आहेत. वैद्यकीय क्षेत्रातील अग्रगण्य नाव असलेले सेवा सदन हेल्थ प्लस हे रुग्णालय येथे दोन वर्षापासून रुग्णांच्या सेवेत कार्यरत झाले आहे. निरामय रुग्णालयाच्या वास्तूत हे रुग्णालय विविध सुविधांसाठी तत्पर आहे. लहान मुलांसह महिलांवरील उपचाराचे हक्काचे ठिकाण म्हणून डॉ. अमेय काजवे व डॉ. सौ. आरुषी काजवे यांच्या डॉ. अशोक काजवे रुग्णालयाचा लौकिक आहे. डॉ. रामदास माने व डॉ. सौ. सुप्रिया माने यांचे माने आर्थोपेडिक हॉस्‍पिटल अस्‍थिव्यंगोपचारासाठी प्रसिद्ध आहे. विविध अचूक वैद्यकीय निदानासाठी डॉ. भास्कर उरुणकर यांचे बुद्धराज डायग्नोस्टीक सेंटर परिचित आहे.
कोरोचीसारख्या निमशहरी भागात डॉ. प्रदीप पाटील व डॉ. शुभांगी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली केअर हॉस्‍पिटलने सर्वसामान्यांना मोठा दिलासा दिला आहे. सर्वसामान्य रुग्णांचे अल्पावधीतच हक्काचे ठिकाण बनले आहे. अनेक महिलांच्या आयुष्यात मातृत्वाचा आनंद देण्यासाठी साफल्य हॉस्‍पिटलच्या माध्यमातून टेस्ट ट्यूब बेबी सेंटर सुरू केले आहे. डॉ. सुरेश देशपांडे व डॉ. मंदार देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही सुविधा शहरात उपलब्ध करून दिली आहे. पोट विकारावर हमखास उपचाराचे केंद्र म्हणून प्रख्यात सर्जन डॉ. महेशकुमार बनकर यांचे श्रद्धा सर्जिकल हॉस्‍पिटल रुग्णांच्या सेवेत अनेक वर्षापासून सेवेत आहे. येथे अनेक गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया यशस्वीरित्या झाल्या आहेत. त्वचारोगावरील उपचारासाठी डॉ. प्रमोद बागवडे यांचे श्री स्कीन केअर क्लिनिक प्रख्यात आहे. येथे विविध त्वचारोगावर उपचार करण्यात येतात.
वैद्यकीय क्षेत्रातील अनेक सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यामागे शहरातील अनेक डॉक्टरांचे योगदान आहे. त्यांच्या दूरदृष्टीतूनच येथे उपचाराचे परिवर्तन सहजपणे साकारले गेले. वैद्यकीय सेवा महाग झाली असली तरी पूर्वीच्या मानाने आता मिळणाऱ्‍या अनेक सुविधांचा विचार करणे क्रमप्राप्त आहे. अनेक गंभीर रुग्णांवर यशस्वी उपचार आणि त्या माध्यमातून रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना मिळणारे समाधान कितीतरी पटीने अधिक आहे. वस्त्रनगरीमध्ये आता वैद्यकीय क्षेत्रातील बहुतांशी सुविधा उपलब्ध होत आहेत. त्यामुळे नजीकच्या काळात सर्व प्रकारच्या वैद्यकीय उपचारासाठी एक चांगले केंद्र म्हणून इचलकरंजी शहर निश्‍चि‍तपणे नावारूपास येणार आहे.
------------
पुरवणी संकलन
पंडित कोंडेकर
संदीप जगताप

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y72923 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..