मसोलीत भात लागवड प्रशिक्षण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मसोलीत भात लागवड प्रशिक्षण
मसोलीत भात लागवड प्रशिक्षण

मसोलीत भात लागवड प्रशिक्षण

sakal_logo
By

मसोलीत भात लागवड प्रशिक्षण
आजरा, ता. १ : महाराष्ट्र शासन कृषि विभाग व कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) अंतर्गत मसोली (ता. आजरा) येथे खरीप हंगाम भात लागवड तंत्रज्ञान यावर शेतकरी प्रशिक्षण झाले. कृषी संजीवनी मोहीम अंतर्गत हा उपक्रम झाला. कृषी विज्ञान केंद्र कणेरी मठाचे विषय विशेषतज्ज्ञ डॉ. पांडुरंग काळे प्रमुख उपस्थित होते. सरपंच तेजम अध्यक्षस्थानी होत्या. डॉ. काळे यांनी भात बियाणे निवड, बीजप्रक्रिया, सेंद्रिय खतांचा वापर, विपनन व्यवस्थापन या विषयावर मार्गदर्शन केले. घनसाळच्या स्थानिक वाणाविषयी माहिती दिली. शास्त्रज्ञ सुनील कुमार यांनी कृषी विज्ञान केंद्र कणेरी मठ येथील शेतीसंबंधी होत असलेले प्रयोग व नवनवीन तंत्रज्ञान या विषयी देखील मार्गदर्शन केले. या वेळी आजरा शेतकरी मंडळाचे अध्यक्ष संभाजीपाव सावंत, कृषी पर्यवेक्षक सुरेश गुरव, ग्रामसेवक पाटील, कृषी सहायक स्वप्नील कमते उपस्थित होते. आत्माचे सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक अमित यमगेकर यांनी स्वागत व सूत्रसंचालन केले. प्रगतशील शेतकरी आप्पा पावले यांनी आभार मानले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y72975 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..