शंभर टक्के वसुली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शंभर टक्के वसुली
शंभर टक्के वसुली

शंभर टक्के वसुली

sakal_logo
By

09765
स्नेहल आरदेशना, कल्याणी वळीव, सूरज पाटील, हर्षदा पाटील, निखिल बिडकर.

चाटे ॲकॅडमीच्या विद्यार्थ्यांचे यश
कोल्हापूर : ऑल इंडिया फॉरेन्सिक सायन्स एन्ट्रन्स टेस्ट परीक्षेत चाटे ॲकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी यश मिळविले.
यशस्वी झालेल्यांत स्नेहल आरदेशना, कल्याणी वळीव, सूरज पाटील, हर्षदा पाटील यांचा समावेश आहे. परीक्षेतून यशस्वी विद्यार्थ्यांना तीन वर्षांची पदवी आणि त्यापुढे दोन वर्षांचे पदव्युत्तर शिक्षण घेता येते. या कालावधीनंतर विद्यार्थ्यांना फॉरेन्सिक सायन्स संबंधित विविध संस्था आणि न्याय वैद्यक शास्त्रातील क्षेत्रामध्ये काम करण्याची संधी मिळू शकते. या प्रकारच्या विविध परीक्षांसाठी अपेक्षित असलेला अभ्यासक्रम चाटे पॅटर्नमध्ये पूर्ण घेतल्यामुळे यश मिळणे सोपे होते. विद्यार्थ्यांचे परिश्रम, चौकस बुद्धी, ज्ञानाचे उपयोजन आणि पालकांनी टाकलेला विश्वास यामुळेच हे शक्य होत आहे, असे चाटे शिक्षण समूहाचे संचालक प्रा. डॉ. भारत खराटे यांनी सांगितले. समूहाचे अध्यक्ष प्रा. मच्छिंद्र चाटे व प्रा. गोपीचंद चाटे, प्रा. खराटे यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळाले.

32791
तबला वादनात सनदे, कांबळे यांचे यश
कोल्हापूर ः छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या १०० व्या जयंतीनिमित्त शाहू संगीत विद्यालयातर्फे जिल्हास्तरीय तबला वादन स्पर्धा झाली. यात विविध संगीत विद्यालयाचे विद्यार्थी सहभागी झाले होते. तालकुंज संगीत विद्यालयातील विद्यार्थ्यानी पारितोषिके पटकावली. लहान गटात रुद्र सनदे प्रथम, मीताली जाधव द्वितीय. मोठ्या गटात अनुक्रमे अनिशा कांबळे, निनाद जाधव, आशुतोष मोरे क्रमांक मिळविला. स्पर्धेचे परीक्षण डॉ. सचिन कचोटे आणि लेहरा साथ विनायक लोहार यांनी केले. या सर्व विद्यार्थ्यांना प्रशिक्षण साहेबराव ऊर्फ सौरभ सनदी यांनी दिले. तबला शिकण्यासाठी उत्सुक असणाऱ्या विद्यार्थ्यांनी व संगीतप्रेमींनी अधिकाधिक लाभ घ्यावा, असे आवाहन श्री. सनदी यांनी व्यक्त केले आहे.

‘हनुमान विकास’ची १०० टक्के वसुली
शिरोली दुमाला: आरळे (ता. करवीर) येथील हनुमान विकास सेवा संस्थेची सलग अकराव्या वर्षी शंभर टक्के वसुली झाली. पंचवीस वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने सभासदांना पाच टक्के डिव्हिडंट व भेटवस्तूंचे वाटप करण्यात आले. सभासद व बॅंक पातळीवर संस्थेला सतत ‘अ’ वर्ग ऑडिट आहे. संस्थेमार्फत सभासदांना पीककर्ज, खावटी कर्ज, मध्यम मुदत, गृह कर्ज व वाहन तारण कर्ज इत्यादी सुविधा पुरविण्यात येतात. संस्थेच्या वसुलीकामी बँक निरीक्षक डी. बी. पाटील, अध्यक्ष वसंत पाटील, उपाध्यक्ष सर्जेराव जाधव व संचालक धनाजी गणपती पाटील, आनंदा बाळू पाटील, मार्गदर्शक बळवंत पाटील व सचिव हिंदूराव पाटील यांचे सहकार्य लाभले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y72976 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top