शिवसेना कार्यकर्ते सत्तेत की विरोधात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिवसेना कार्यकर्ते सत्तेत की विरोधात
शिवसेना कार्यकर्ते सत्तेत की विरोधात

शिवसेना कार्यकर्ते सत्तेत की विरोधात

sakal_logo
By

शिवसेनेसमोर पुनर्बांधणीचे आव्हान
शिंदे गट की कट्टर शिवसैनिक; कार्यकर्त्यांतही पडणार दरी
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ३० ः शिवसेनेतील एकनाथ शिंदे आता मुख्यमंत्री झाल्यामुळे जिल्ह्यातील शिवसेनेला पुनर्बांधणी करावी लागणार आहे. कट्टर शिवसैनिकविरुद्ध शिंदे गटाचे सैनिक असे दोन गट आता हिंदुत्वाच्या विचाराने पुढे येणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर हे सरकार किती दिवस चालणार हे नक्की होईल. मात्र आजच्या राज्यातील निर्णयामुळे जिल्ह्यातील शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना पक्षबांधणीसह टिकविण्यासाठी जीवाचे रान करावे लागणार आहे. गावोगावी, गल्लोगल्ली शिवसेनेच्या शाखांसह कार्यकर्ते तयार करण्याचे आव्हान आजच्या घडीला दिसून येते.
जिल्ह्यात शिवसेना रुजविताना ज्या पद्धतीने शिवसेनेचे गल्लोगल्ली, गावोगावी शाखांचे फलक दिसत होते. कार्यकर्ते भगवा स्कार्फ गळ्यात घालून रस्त्यावर उतरत होते. शिवसेनेने पुकारलेला बंद म्हणजे शंभर टक्के यशस्वी मानला जात होता. शिवसैनिक एखाद्या प्रश्‍नावर आक्रमक होता. गावातील, नगरपालिकेतील, महानगरपालिकेतील प्रत्येक प्रश्‍नावर आंदोलन करणारा शिवसैनिक होता. रेशनच्या धान्यासाठी रस्त्यावर उतरून कार्यकर्ता शिवसेना जिवंत ठेवत होता. शिवसेना वाढवत होता. यातूनच काही आमदार झाले. मात्र त्या काळची परिस्थिती ही केवळ शिवसैनिक म्हणजे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे हे एकमेव डोळ्यासमोर ठेवून होती. सर्वजण भगव्या झेंड्याखाली एकत्रित आले होते. आजची परिस्थिती वेगळी आहे. शिंदे गटात जिल्ह्यातील तीन प्रमुख नेते आहेत. त्यांचा गट आता शिंदे गट म्हणून जिल्ह्यात कार्यरत राहण्याची शक्यता आहे. याचवेळी कट्टर शिवसैनिक म्हणून दुसरा गट कार्यरत राहणार आहे. अर्थातच एकाच प्रश्‍नावर दोन्ही कार्यकर्ते एकाच ठिकाणी पुढे येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याचे कारण म्हणजे बंडखोरीच्यावेळी कट्टर शिवसैनिक आणि शिंदे गटाचे कार्यकर्ते आमने-सामने आले होते. त्याची पुनरावृत्ती पुढील कालावधीत दिसून येण्याची शक्यता आहे.

शिवसैनिक घडवावा लागणार
शिंदे गटाकडे सत्ता असल्यामुळे बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसैनिक कट्टर राहणार की सत्तेचा मागे धावणार यावर पुढील समिकरणे ठरतील. बंडखोरी केलेल्यांना मंत्रिपदे मिळाली तर जिल्ह्यात त्यांचा गट अधिक सक्षम होईल. मात्र कट्टर शिवसैनिकांना बळ देण्यासाठी राज्यस्तरावरून किती प्रयत्न होणार आहेत. या कट्टर शिवसैनिकांना कोण वाली ठरणार, त्याचा उपयोग किती होणार यावर सेनेचे भवितव्य ठरणार आहे. यासाठीच तळागाळातून शिवसेनेची पुनर्बांधणी करावी लागणार आहे. पुन्हा नवे शिवसैनिक घडवावे लागणार आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y72983 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..