बाल शाहूराजा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बाल शाहूराजा
बाल शाहूराजा

बाल शाहूराजा

sakal_logo
By

32840

बाल शाहूराजा वेशभूषा स्पर्धेला प्रतिसाद
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ३० ः लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे कार्य नव्या पिढीच्या डोक्यावरून न जाता ते डोक्यात जाणे आवश्यक आहे. त्यासाठी शाहू महाराजांनी सुरू केलेले कार्य अखंडपणे पुढे सुरू राहिल, अशी ग्वाही मधुरिमाराजे छत्रपती यांनी दिली. ‘स्वयंप्रभा’ मंचच्या वतीने व्ही.टी. पाटील हॉल येथे आयोजित केलेल्या ‘बाल शाहूराजा’ वेशभूषा स्पर्धेच्या बक्षिस वितरणावेळी त्या बोलत होत्या.
मधुरिमाराजे म्हणाल्या, ‘‘स्वयंप्रभा मंचने शाहू जयंती निमित्त ही स्पर्धा घेऊन शाहू महाराज यांचे कार्य नव्या पिढीसमोर आणण्यासाठी खूप चांगला प्रयत्न केला आहे. भविष्य काळात अशा उपक्रमांना माझेही योगदान राहील.‘‘
स्वयंप्रभा मंचच्या संस्थापक अध्यक्षा सारिका बकरे यांनी मंचच्या वतीने आजपर्यंत घेतलेल्या आणि भविष्यातील विविध उपक्रमांची माहिती दिली. या स्पर्धेत पस्तीसहून अधिक बाल स्पर्धकांनी सहभाग घेतल्याचे त्यांनी सांगितले. स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून नृत्यदिग्दर्शक संग्राम भालकर, नाट्य दिग्दर्शक किरणसिंह चव्हाण व अभिनेत्री, वेशभूषाकार रितिका राजे यांनी काम पहिले. संस्थेच्या कार्याध्यक्षा शुभदा हिरेमठ यांनी सूत्रसंचालन केले.
.........
निकाल असा...
० बाल गट ः शिवांश प्रमोद पाटील, शौर्य कपिल नाळे, रणवीर संदिप वेरणेकर, पूर्वी कृणाल चौगुले, हिमांशु हर्षद गोडबोले, विश्वेंद्र देवेंद्र रेडेकर
० किशोर गट ः रुद्राक्षी प्रसाद हिरेमठ, अनुष्का अभिजित साळुंखे, नंदिनी नवनाथ सोहनी, तनिष्का तानाजी नलवडे

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y73095 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..