बाल स्‍वास्‍थ्य मधू्न यशस्‍वी शस्‍त्रक्रिया | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बाल स्‍वास्‍थ्य मधू्न यशस्‍वी शस्‍त्रक्रिया
बाल स्‍वास्‍थ्य मधू्न यशस्‍वी शस्‍त्रक्रिया

बाल स्‍वास्‍थ्य मधू्न यशस्‍वी शस्‍त्रक्रिया

sakal_logo
By

जिल्‍हा परिषदेतून...

(फोटो मोहन

हातकणंगले तालुक्यातील एका अंगणवाडीत हृदयाचे ऑपरेशन झालेल्या बाळाचे स्‍वागत करताना अंगणवाडी कर्मचारी.

...आणि त्यांच्या चेहऱ्‍यावर फुलले हसू
‘बाल स्‍वास्थ्य’मधू्न १६ बालकांवर यशस्‍वी शस्‍त्रक्रिया
सकाळ वृत्तसेवा
कोल्‍हापूर, ता. १ : चिमुकल्या मुलांवर शस्‍त्रक्रिया करण्याच्या भीतीने पालकांची तारांबळ उडाली होती. जीव कासावीस झाला होता. लहान वयात शस्‍त्रक्रिया झाले नाही तर पुढे आणखी त्रास होण्याही भीती होती. मात्र एवढ्या लहान वयात बाळावर शस्‍त्रक्रिया करायला, पालकांचे मन धजत नव्‍हते. अखेर जिल्‍हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक संजयसिंह चव्‍हाण यांनी पालकांना विश्‍‍वासात घेऊन, ऑपरेशनबाबत खात्री देऊन यासाठी तयार केले. १६ तारखेला सर्व मुलांना ऑपरेशनसाठी मुंबई येथील फोर्टीस हॉस्पिटलला दाखल केले. एक, दोन नव्‍हे तर तब्‍बल १६ बालकांवर यशस्‍वी शस्‍त्रक्रिया केल्या. या शस्‍त्रक्रियांनी मुलांसह पालकांच्या चेहऱ्‍यावरही हसू फुलले. ही मुले बरी होऊन शाळेतही येऊ लागली आहेत. या मुलांचे शाळांमध्ये जंगी स्‍वागत होत आहे.

राष्‍ट्रीय बालस्‍वास्‍थ्य कार्यक्रमांतर्गत शून्य ते सहा वयोगटातील अंगणवाडीतील बालकांची तपासणी वर्षातून दोन वेळा करण्यात येते; तर शालेय मुलांची तपासणी वर्षातून एकदा केली जाते. या तपासणीत हृदयरोग असणारी बालके; तसेच इतर आजारांत अस्‍थिव्यंग, कान-नाक-घसा, हार्निया, फायमोसिस, अनडिसेंटेड टेस्‍टीजसारख्या आजारांवर मोफत शस्‍त्रक्रिया करण्यात येते. या तपासणीत १६ बालकांवर हृदय शस्‍त्रक्रिया करणे आवश्यक असल्याचे तपासणीत दिसून आले.
शस्‍त्रक्रिया यशस्‍वी होईल का? मुलांची तब्येत पूर्वीसारखी राहील का? त्यांना काही त्रास होईल का? असे विविध प्रश्‍‍न पालकांच्या मनात होते. या सर्व शंकाचे निरसन करून मुख्य कार्यकारी अधिकारी चव्‍हाण यांनी पालकांना आधार दिला. त्यांना शस्‍त्रक्रियेसाठी पाठवणे, सर्व वैद्यकीय व्यवस्‍था व पुन्‍हा शस्‍त्रक्रियेनंतर घरात पोहोचवण्याची जबाबदारी घेतली. आज या सोळाही मुलांवर यशस्‍वी शस्‍त्रक्रिया केली असून ही मुले सुखरूप घरी पोहोचली. तसेच काही मुलांनी शाळेतही जाण्यास सुरवात केली आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y73130 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..