बहुपीक पद्धतीने शेती फायदेशीर करावी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बहुपीक पद्धतीने शेती फायदेशीर करावी
बहुपीक पद्धतीने शेती फायदेशीर करावी

बहुपीक पद्धतीने शेती फायदेशीर करावी

sakal_logo
By

32916
----
बहुपीक पद्धतीने शेती फायदेशीर करावी
गटविकास अधिकारी शंकर कवितके; शिरोळमध्ये कृषी दिन
दानोळी, ता. १ ः फायदेशीर शेती व्यवसाय करताना नियोजन अतिशय महत्त्वाचे आहे. एकाच पिकावर अवलंबून न राहता बहुपीक पद्धती अवलंबून शेती फायदेशीर करावी, असे आवाहन शिरोळ पंचायत समितीचे गटविकास अधिकारी शंकर कवितके यांनी येथे केले. ते शिरोळ येथे पंचायत समिती व शिरोळ तालुका कृषी अधिकारी कार्यालयातर्फे आयोजित कृषी दिनाच्या कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून बोलत होते.
कवितके यांनी शेती करताना प्रत्येक घटकावर शास्त्रीयदृष्ट्या पहाणे गरजेचे आहे. त्यानुसारच खते व अन्य घटकांचा वापर करणे उत्पादन वाढीसाठी असल्याचे मत व्यक्त केले. तालुका कृषी अधिकारी गणेश भोसले यांनी कृषी विभागाच्या योजनांचा आढावा घेतला.
प्रगतशील शेतकरी चवगोंडा सकाप्पा, भाऊसाहेब शिरढोणे, कुमार किणिंगे, शेती मित्र पुरस्कार विजेते ॲग्रोवनचे कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी राजकुमार चौगुले आदींचा सत्कार झाला. पंचायत समिती कृषी अधिकारी सौ. दीप्ती बावधनकर, सुरेश दानवाडकर, मंडल कृषी अधिकारी निरंजन देसाई, विस्तार अधिकारी बी. बी. गोवंदे, आर. बी. सिद्धनावर आदी उपस्थित होते. कृषीचे विस्तार अधिकारी अनिकेत भिलवडे यांनी सूत्रसंचालन केले. कृषी पर्यवेक्षक संजय सुतार यांनी आभार मानले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y73202 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..