
जाहिरात बातमी
३३०५७, ३३०५६, ३३०५४
यूपीएससीतील यशवंतांशी
रविवारी खुला संवाद
कोल्हापूर, ता. १ ः येथील विद्या प्रबोधिनी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रातर्फे यंदाच्या आयएएस परीक्षेतील यशवंतांशी संवाद साधण्याची संधी दिली जाणार आहे. हा कार्यक्रम रविवारी (ता. ३) व्ही. टी. पाटील सभागृह, राजारामपुरी येथे सकाळी अकरा ते एक या वेळेत होणार असून, सर्वांसाठी खुला व मोफत आहे. यामध्ये ओंकार पवार (रँक १९४), रामेश्वर सब्बनवाड (रँक २०२) व ओंकार शिंदे (रँक ४३३) या युपीएससीतील यशवंतांचा सत्कार होईल.
यूपीएसीच्या तयारी सोबतच एमपीएससीने नुकत्याच बदललेल्या अभ्यास पद्धतीला कसे सामोरे जाता येईल, याचेही मार्गदर्शन यशवंत करतील. नवीन बदलानुसार एमपीएससीची राज्यसेवा परीक्षा आता संपूर्णतः यूपीएससीच्या धर्तीवर होणार असल्याने त्यासंदर्भात यूपीएससी यशवंतांचे मार्गदर्शन मोलाचे ठरणार आहे. दीपस्तंभ फाउंडेशन तथा मनोबल जळगावचे यजुर्वेंद्र महाजन व आयकर उपायुक्त महेश लोंढे (IRS) यांची प्रमुख उपस्थिती असेल. जिल्ह्याच्या ग्रामीण तथा निमशहरी भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा व विशेषता यूपीएससी परीक्षांच्या तयारीसंदर्भात पुणे, दिल्लीतील दर्जाचे मार्गदर्शन प्रत्यक्ष कोल्हापूरमध्ये मिळावे यासाठी आमदार चंद्रकांत पाटील यांनी प्रयत्न केले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमाला स्पर्धा परीक्षार्थी, इतर विद्यार्थी व पालकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन विद्या प्रबोधिनीचे अध्यक्ष राहुल चिकोडे व संचालक राजकुमार पाटील यांनी केले.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y73279 Txt Kopcity Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..