बिबट्याचे कातडे जप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बिबट्याचे कातडे जप्त
बिबट्याचे कातडे जप्त

बिबट्याचे कातडे जप्त

sakal_logo
By

32959

सहा लाखांचे बिबट्याचे कातडे जप्त

दोघे संशयित जेरबंद; दिंडनेर्ली परिसरात कारवाई

सकाळ वृत्तसेवा
नंदगाव, ता. १ ः वन्य प्राण्यांचे कातडे बाळगल्या प्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने दोघांना जेरबंद केले. त्यांच्याकडून सहा लाखांचे बिबट्याचे कातडे जप्त केले. बाजीराव श्रीपती यादव (वय ३९, रा. सोनुर्ले, ता. भुदरगड) आणि ब्रह्मदेव शशिकांत पाटील (वय ३२, रा. किटवडे, ता. आजरा) अशी त्या संशयितांची नावे आहेत. ही कारवाई दिंडनेर्ली (ता. करवीर) परिसरात केल्याचे पोलिस निरीक्षक संजय गोर्ले यांनी सांगितले.
पोलिसांनी सांगितले, वन्य प्राण्यांची बेकायदा शिकार, तस्करीच्या प्रकाराला आळा घालण्याच्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून वेगवेगळ्या पथकांद्वारे तपास सुरू होता. दरम्यान, अंमलदार संभाजी भोसले यांना दोघे संशयित गारगोटीमार्गे दिंडनेर्ली परिसरात येणार आहेत. त्यांच्याकडे वन्य प्राण्यांचे कातडे असून, ते विक्रीसाठी आणणार असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी सापळा रचून संशयित बाजीराव यादव आणि ब्रह्मदेव पाटील या दोघा संशयितांना ताब्यात घेतले. त्याच्याकडील सहा लाखांचे बिबट्याचे कातडेही जप्त केले. त्या दोघांना मुद्देमालासह इस्पूर्ली पोलिस ठाण्याच्या ताब्यात दिले. हे कातडे कोठून आणले? त्यामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का? आदीचा तपासही सुरू असल्याचे पोलिस निरीक्षक गोर्ले यांनी सांगितले. ही कारवाई गोर्लेंसह अमलदार संभाजी भोसले, राजीव शिंदे, खंडेराव कोळी, बालाजी पाटील यांनी केली.
------------

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y73280 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..