
पायी दिंड्यांचे प्रस्थान
३३०४२
दिंडी चाललीऽऽऽ विठ्ठलाच्या दर्शनाला!
जिल्ह्यातून बहुतांश पायी दिंडीचे प्रस्थान
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १ ः ‘निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई, एकनाथ, नामदेव तुकारामऽऽऽ’ असा अखंड गजर करत तब्बल दोन वर्षांनंतर पंढरपूरच्या विठुरायाच्या दर्शनासाठी पायी दिंड्यांचे प्रस्थान आता होऊ लागले आहे. कालपासून कागल, बेळगाव, चुये, येवती आदी परिसरातील दिंड्यांचे प्रस्थान झाले, तर आज फुलेवाडी, दोनवडे, विश्वपंढरी, कुंभार मंडप, कसबा बावडा आदी ठिकाणच्या पायी दिंड्यांचे प्रस्थान झाले. उद्या (शनिवारी) शहरातील उत्तरेश्वर पायी दिंडीचे प्रस्थान होणार आहे.
जिल्ह्यातील पायी दिंड्यांना तीनशेहून अधिक वर्षांची परंपरा असून, सव्वाशेहून अधिक दिंड्या प्रत्येक वर्षी पंढरपूरला जातात. दोन वर्षे कोरोनामुळे दिंड्यांवर निर्बंध राहिले. मात्र, यंदा पारंपरिक उत्साहात प्रस्थान होऊ लागले आहे. मात्र, होणारी गर्दी लक्षात घेऊन सर्व दिंड्यांनी आरोग्यविषयक खबरदारीच्या उपायांवर भर दिला आहे. रोज वीस ते पंचवीस किलोमीटरचा प्रवास करत या दिंड्या नऊ जुलैपर्यंत पंढरपुरात पोचणार आहेत.
स्थानिक मंदिरांतही विविध कार्यक्रम
पंढरपूर वारीबरोबरच आषाढी एकादशीनिमित्त स्थानिक विठ्ठल मंदिरातही विविध कार्यक्रमांचे आयोजन होणार आहे. दिवसभर दर्शनासाठी मंदिरात होणाऱ्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर दर्शन रांगांची व्यवस्था केली जाणार आहे. कोल्हापूर ते नंदवाळ प्रतिपंढरपूर वारीची तयारीही अंतिम टप्प्यात आली आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y73290 Txt Kopcity Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..