आजरा ः कृषी दिन कार्यक्रम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आजरा ः कृषी दिन कार्यक्रम
आजरा ः कृषी दिन कार्यक्रम

आजरा ः कृषी दिन कार्यक्रम

sakal_logo
By

आधुनिक तंत्रज्ञानाची
शेतकऱ्यांनी कास धरावी
सुरेश दोरुगडे ः आजऱ्यात कृषी दिन उत्साह
सकाळ वृत्तसेवा
आजरा, ता. २ ः शेती अभ्यासूवृत्तीने व शास्त्रोक्त पद्धतीने करावी. आधुनिक तंत्रज्ञानाची कास शेतकऱ्यांनी धरावी, असे आवाहन प्रगतशील शेतकरी सूर्यकांत दोरुगडे यांनी केले. येथील पंचायत समितीमध्ये कृषी दिनानिमित्त माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते झाले. प्रभारी गटविकास अधिकारी सुधाकर खोराटे, तालुका कृषी अधिकारी के. एल. मोमीन, मंडल कृषि अधिकारी निलकुमार ऐतवडे, विस्तार अधिकारी ए. बी. मासाळ, आधी प्रमुख उपस्थित होते. श्री ऐतवडे यांनी स्वागत केले. प्रास्ताविकात नाईक यांनी कृषी क्षेत्रात दिलेल्या योगदानाबद्दल माहिती दिली.
श्री. दोरुगडे म्हणाले, ‘‘शेतकऱ्यांनी शेतीमध्ये अधिकाधिक उत्पादन घ्यावे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा. जे विकतेय ते पिकवावे. गतवर्षी पिक स्पर्धेतील विजेते शेतकरी संभाजी मारुती पाटील (वझरे), किरण कृष्णाजी देशपांडे (हाजगोळी बु), श्रीमती बायाक्का रामू पोवार (मोरेवाडी) यांचा सत्कार झाला. कोरोना काळात मृत झालेल्या शेतकऱ्यांच्या विधवांना मोफत बियाण्याचे वाटप झाले. श्री. पाटील म्हणाले, पंतप्रधानमंत्री पीक विमा योजनेची माहीती दिली. तालुका कृषी अधिकारी श्री. मोमीन यांनी कृषीच्या विविध योजनांची माहीती दिली. एस. एस. येरूडकर, प्रभारी गटशिक्षणाधिकारी बी. सी. गुरव यासह विविध विभागप्रमुख, अधिकारी, शेतकरी उपस्थित होते. कृषी अधिकारी दिनेश शेटे यांनी आभार मानले. श्रीनिवास अपसंगी यांनी नियोजन केले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y73336 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top