महिला पोलिस अधिकारी ‘लाचलुचपत’ च्या जाळ्यात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महिला पोलिस अधिकारी  ‘लाचलुचपत’ च्या जाळ्यात
महिला पोलिस अधिकारी ‘लाचलुचपत’ च्या जाळ्यात

महिला पोलिस अधिकारी ‘लाचलुचपत’ च्या जाळ्यात

sakal_logo
By

महिला पोलिस अधिकारी
‘लाचलुचपत’ च्या जाळ्यात
पुण्यात कारवाई; सिंधुदुर्ग अधीक्षक कार्यालयात कार्यरत
सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. १ ः गर्भलिंग निदान केल्याच्या आरोपानंतर निगडी-पुणे येथील हॉस्पिटलचे सोनोग्राफी सेंटर सील न करण्यासाठी, तसेच गुन्ह्याच्या तपासात सहकार्य करण्यासाठी पाच लाखांची लाच मागितल्याप्रकरणी पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सिंधुदुर्ग महिला अत्याचार निवारण कक्षात कार्यरत असलेल्या सहायक पोलिस निरीक्षक नलिनी शंकर शिंदे यांना ताब्यात घेतले आहे. दोन लाख रुपयांची रोकड घेताना त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. ही कारवाई पुणे येथे करण्यात आली.
याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेली माहिती अशी ः यातील गुन्हा पुणे-निगडी येथील एका हॉस्पिटलमध्ये घडला होता. याप्रकरणी याची नोंद मालवण पोलिस ठाण्यात केली होती. त्या ठिकाणी महिला पोलिस अधिकारी नसल्यामुळे या गुन्ह्याचा तपास शिंदे यांच्याकडे देण्यात आला होता. दरम्यान, याकामी तपास करताना शिंदे यांनी तक्रारदार तथा संबंधित हॉस्पिटच्या ६२ वर्षीय महिला डॉक्टरांना आपण तपासकामात सहकार्य करते, तसेच हॉस्पिटलमधील सोनोग्राफी सेंटर सील करीत नाही, असे सांगून पाच लाखांची मागणी केली. याची तक्रार संबंधित महिलेने पुणे लाचलुचपत विभागाकडे तक्रार दिली होती.
सिंधुदुर्ग पोलिसांच्या महिला तक्रार निवारण कक्षात कार्यरत असलेल्या शिंदे या संबंधित डॉक्टर महिलेकडून लाच मागितलेली रक्कम घेण्यासाठी पुणे येथे गेल्या होत्या. यावेळी पुणे येथील लाचलुचपत विभागाने गुरुवारी (ता.३०) सापळा रचत ही कारवाई केली. रोख दोन लाख रुपये घेताना त्यांना पकडण्यात आले आहे. यामुळे जिल्ह्याच्या पोलिस यंत्रणेत खळबळ माजली आहे. त्यानंतर शिंदे यांना अटक केली आहे. पुणे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधीक्षक राजेश बनसोडे, अपर पोलिस उपअधीक्षक सूरज गुरव यांनी ही कारवाई केली आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y73353 Txt Kolhapur1

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top