कोरोना नवे रूग्ण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोरोना नवे रूग्ण
कोरोना नवे रूग्ण

कोरोना नवे रूग्ण

sakal_logo
By

कोरोना

जिल्ह्यात ९ नवे कोरोनाबाधित
कोल्हापूर, ता. १ ः जिल्ह्यात आज दिवसभरात नऊ नवे कोरोनाबाधित सापडले आहेत. १६ व्यक्ती कोरोनामुक्त झाल्या आहेत. त्यामुळे उपचार घेणाऱ्या कोरोनाबाधितांची संख्या ६६ झाली. यातील ११ व्यक्ती रुग्णालयात उपचार घेत आहेत. तर उर्वरित सौम्य लक्षणांच्या असल्याने त्यांच्यावर घरीच उपचार सुरू आहेत. १५ दिवसांपासून जिल्‍ह्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. पावसाळी वातावरणामुळे नियमित आजाराची लक्षणे असलेल्या रुग्‍णांची संख्या वाढली आहे. यातही ज्या व्यक्ती व्याधीग्रस्त आहेत अशांना सर्दी, खोकला, ताप यांसह कोरोना सदृश लक्षणे दिसली तर खबरदारींचा भाग म्हणून कोरोना चाचणी करण्याचा सल्ला डॉक्टरांकडून देण्यात येतो. त्यामुळे १० दिवसांत रोज सरासरी तीनशेवर व्यक्तींची कोरोना चाचणी होत आहे.
यातील व्याधीग्रस्त व वयोवृद्ध व्यक्तींनाच खबरदारीचा भाग म्हणून रुग्णालयात ॲडमीट केले आहे. उर्वरित सर्व कोरोनाबाधित सौम्य लक्षणांचे असल्याने त्यांना चार दिवसांचे उपचार व विश्रांतीचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.
इचलकरंजीत प्रियदर्शिनी कॉलनीतील एकजण बाधीत झाला आहे. अमरावती येथे जावून आल्याचा त्याचा प्रवासाचा इतिहास आहे. त्याच्यावर सेवा भारती रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y73355 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..