
सतेज पाटील
33113
सहकार्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद
सतेज पाटील यांनी व्यक्त केली कर्मचाऱ्यांबद्दल कृतज्ञता
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १ ः उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकारमध्ये अडीच वर्षे राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी काम केले. ते करत असताना सर्व कर्मचाऱ्यांनी केलेले सहकार्य कायम लक्षात राहील, अशा शब्दात माजी मंत्री सतेज पाटील यांनी मुंबई आणि येथील कार्यालयीन कर्मचाऱ्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. श्री. पाटील यांनी सर्व कर्मचाऱ्यांसाठी दोन्ही ठिकाणी कार्यक्रम आयोजित केला होता. खाजगी सचिव, विशेष कार्य अधिकारी, स्वीय सहायक, पोलिस स्टाफ यांच्यापासून शिपाई, स्वयंपाकी, सुरक्षारक्षक यांची वैयक्तिक भेट घेत सर्वांचे त्यांनी आभार मानले. ते म्हणाले, ‘‘सर्वसामान्य नागरिकांच्या हितासाठी महाविकास आघाडी सरकारमध्ये कार्यरत असताना जे लोकहिताचे निर्णय घेऊ शकलो, यात सर्वांचे प्रत्यक्ष -अप्रत्यक्षपणे योगदान राहिले आहे. कोरोनाच्या काळात राज्यातील जनतेच्या आरोग्यासाठी माझ्यासोबत ऑन फिल्ड आणि ऑफ फिल्ड जे काम केले आहे, ते माझ्या कायम लक्षात राहील. लोकांच्या भल्याचा विचार करीत समाजसेवेचे माध्यम म्हणून मी राजकारणाकडे पाहत आलो आहे.’’ महाराष्ट्र पोलिस विभागातील सर्वोच्च अधिकारी ते विभागातील शेवटचा पोलिस कर्मचारी मन लावून आणि निष्ठेने काम करतात. म्हणूनच महाराष्ट्र पोलिसांची जगभरात वेगळी ओळख असल्याचे त्यांनी सांगितले.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y73390 Txt Kolhapur
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..