पत्रकांच्या काही बातम्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पत्रकांच्या काही बातम्या
पत्रकांच्या काही बातम्या

पत्रकांच्या काही बातम्या

sakal_logo
By

निवृत्त संघटनेततर्फे
मंगळवारी व्याख्यान
कोल्हापूर : जिल्हा निवृत्त कर्मचारी संघटनेमार्फत मंगळवारी (ता. ५) दुपारी चारला मिरजकर तिकटी, महसूल भवन येथे संस्थेच्या कार्यालयात साहित्यिक बाबूराव शिरसाट यांची प्रकट मुलाखत आयोजित केली आहे. जिल्हा निवृत्त कर्मचारी संघटनेमार्फत नेहमी विविध उपक्रम राबविण्यात येतात. दर महिन्याच्या पहिल्या मंगळवारी व्याख्यानाचे आयोजन करण्यात येते. संघटनेच्या सभासदांनी लाभ घ्यावा, असे आवाहन अध्यक्ष हिंदुराव पाटील, कार्यवाह नंदकुमार रामाणे यांनी केले आहे.

दिव्यांगांची सोमवारी बैठक
कोल्हापूर : जिल्हा काँग्रेस कमिटी अपंग सेलची बैठक सोमवारी (ता. ४) दुपारी बाराला काँग्रेस कमिटी, स्टेशन रोड येथे नारायण लोहार यांचे अध्यक्षतेखाली, आनंदराव पाटील यांच्या उपस्थितीत होत आहे. दिव्यांगांच्या संजय गांधी पेन्शन, दिव्यांगांचा पाच टक्के निधी, दिव्यांगांची जिल्हा परिषद आणि आर्थिक विकास महामंडळाकडील कर्ज प्रकरणे, दिव्यांगांना अंत्योदय योजनेतील धान्य मिळण्यासाठी दिलेल्या अर्जातील त्रुटी, त्यासंदर्भात येणाऱ्या अडचणी, कार्यकारिणीकरिता नवीन सदस्यांची निवड करणे, दिव्यांगांच्या सोयी-सवलतीबाबत माहिती देणे तसेच त्याबाबतच्या अडचणी समजावून घेऊन निवेदन तयार करायचे आहे. उपस्थित राहण्याचे आवाहन चंद्रकांत भालकर यांनी केले.

वसंतराव नाईक यांची जयंती
कोल्हापूर : शिक्षणशास्त्र अध्यापक शिक्षण संस्था संचलित, वसंतराव नाईक शिक्षणशास्त्र महाविद्यालय, कळंबा येथे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची जयंती साजरी झाली. वसंतराव नाईक यांच्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक कार्याचा आढावा डॉ. सूर्यभान पवार यांनी घेतला. महाविद्यालयाच्या परिसरात वृक्षारोपण केले. प्राचार्य डॉ. शिवाजी पाटील यांनी प्रास्ताविक केले. प्रा. धनंजय चाफोडीकर अध्यक्षस्थानी होते. डॉ. मनीषा पाटील, डॉ. अण्णासाहेब पाटील, डॉ. ऊर्मिला पाटील, शुभांगी पाटील, गुरुदास जिरगे, वर्षा पाटील, कमलाकर गुरव, संतोष मिसाळ, ऋषीकेश शिंदे उपस्थित होते. अनिता पाटील यांनी आभार मानले.

‘अवनि’तर्फे प्रशिक्षण कार्यशाळा
कोल्हापूर : जागर प्रकल्पांतर्गत एकदिवसीय ग्राम बालसंरक्षण समिती प्रशिक्षण कार्यशाळा झाली. चुये, इस्पुर्ली, नागाव, खेबवडेत ग्राम बाल संरक्षण समितीचे सदस्य आणि ग्रामसेवकांबरोबर कार्यशाळा घेण्यात आली. पंचायत समिती करवीरचे (प्रशासक) गटविकास अधिकारी जयवंत उगले, ‘अवनि’च्या अध्यक्षा अनुराधा भोसले, जागर प्रकल्प समन्वयक प्रमोद पाटील उपस्थित होते. अनुराधा भोसले यांनी मुलांचे अधिकार, मुलांच्या समस्या, उपाययोजनांबाबत मार्गदर्शन केले. श्री. पाटील यांनी ग्राम बाल संरक्षण समितीची गरज, कार्य आणि अधिकाराबाबत माहिती दिली. श्री. उगले यांनी करवीर तालुक्यातील जिल्हा परिषद मतदारसंघनिहाय ग्रामबाल संरक्षण समिती कार्यशाळा आयोजित करण्याचे आश्वासन दिले. ग्रामसेवक गीतांजली वाईंगडे, सुरेश शेंडगे, योजना जंगम, बशीर मुजावर, सरपंच कविता साहेकर, सुयोग वाडकर आदी उपस्थित होत्या. सिद्धांत घोरपडे यांनी प्रास्ताविक केले.


गणित छंद मंडळाचे उद्‌घाटन
कोल्हापूर : प्रिन्सेस इंदुमतीदेवी हायस्कूल फॉर गर्ल्समध्ये गणित छंद मंडळाचे उद्‌घाटन झाले. मुख्याध्यापिका शैलजा भोसले, चारुता शिंदे यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. दैनंदिन जीवनातील गणिताचे महत्त्व सांगितले. तीसपर्यंत पाढे पाठ असणाऱ्या श्रावणी कोल्हापुरे, श्रेया कुरणे यांना रंजना स्वामी यांच्या हस्ते बक्षीस दिले. गणित विभागप्रमुख सुलक्षणा मुळे यांची निवड झाली. संस्थेच्या अध्यक्षा मधुरिमाराजे छत्रपती यांचे प्रोत्साहन लाभले. संस्कृती पाटील हिने सूत्रसंचालन केले. वैष्णवी धानवडकर हिने आभार मानले.

कचरावेचकांची सहकारी संस्था
निर्माण होणार : अनुराधा भोसले
कोल्हापूर, ता. २ : आंतरराष्ट्रीय सहकार दिनाच्या मुहूर्तावर जिल्ह्यातील कचरावेचक महिला सहकारी संस्था स्थापन करणार असल्याचा निर्धार आज केला. कचरावेचकांची आर्थिक, सामाजिक स्थिती सुधारण्याकरिता अवनी संस्थेंतर्गत कोल्हापूर, सांगली, सातारा येथे कचरावेचक महिलांचे संघटन तयार केले आहे. कचरावेचक महिलांची आर्थिक परिस्थिती बेताची असून, त्यांना माणूस म्हणून जगता यावे, म्हणून अवनी संस्था प्रयत्नशील आहे. कचरावेचकांची सहकारी संस्था उभी झाल्याने कचरा विचारांच्या सामाजिक स्थितीत परिवर्तन घडेल, असा विश्वास संस्थाध्यक्ष अनुराधा भोसले यांनी व्यक्त केला. जिल्ह्यात कचरावेचक महिलांचे ५० बचत गट असून, या महिला नियमित बचत करतात. शासनाबरोबर गटांचे जोडणी प्रक्रिया पूर्ण झाली आहे. या महिलांना शासकीय ठेक्याची कामे, जिल्हा फेडरेशनची कामे, आंतरराष्ट्रीय निधी मिळण्यासाठी तसेच कचरावेचकांची सामाजिक स्थिती बदलण्यासाठी श्रमजीवी असंघटित महिला कामगार सहकारी संस्थेची स्थापना केली जाणार आहे.
बैठकीसाठी राजेंद्रनगर, विचारे माळ, यादवनगर, मुडशिंगी, केर्ली, कात्यायनी कॉम्प्लेक्स, रुकडी, हातकणंगले, हुपरी, इचलकरंजी, जयसिंगपूर यड्राव, पेठवडगाव, नवेपारगाव, वडणगे, साळोखे पार्क, संभाजीनगर येथील वस्ती प्रमुख, बचत गटांच्या अध्यक्ष उपस्थित होत्या. अवनी संस्थेचे कचरावेचक महिला विकास प्रकल्पप्रमुख जैनुदिन पन्हाळकर, अभिजित जाधव, वनिता कांबळे, तेजस्विनी घोरपडे, कार्यक्रम अधिकारी साताप्पा मोहिते, किरण नाईक उपस्थित होते.
...

डॉ. साळे शाहू समाजरत्न पुरस्कार
कोल्हापूर : राजर्षी शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त परिवर्तन फाउंडेशनतर्फे शाहू समाजरत्न पुरस्कार जिल्हा परिषदेचे मुख्य आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे यांना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांच्या हस्ते दिला. जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अरुण जाधव, जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अशोक ढोंगे, माध्यमिक शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर, जिल्हा कृषी विकास अधीक्षक भीमाशंकर पाटील, ‘परिवर्तन’चे अध्यक्ष अमोल कुरणे आदी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y73584 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top