राष्ट्रवादी बैठक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राष्ट्रवादी बैठक
राष्ट्रवादी बैठक

राष्ट्रवादी बैठक

sakal_logo
By

३३२५२

सरकारे येतील जातील; नाराज होऊ नका
माजी मंत्री हसन मुश्रीफ ः राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना नव्या दमाने कामाला लागण्याचे आवाहन
कोल्हापूर, ता. २ ः अडीच वर्षांपूर्वी युतीला जनतेचा कौल होता; पण आम्हाला लॉटरी लागली. राजकारणात सरकारे येत असतात आणि जात असतात; परंतु नाराज होऊन खचून न जाता नव्या दमाने काम करा, असे आवाहन माजी मंत्री आमदार हसन मुश्रीफ यांनी कार्यकर्त्यांना केले. पक्षसंघटना मजबूत करा. गोरगरिबांच्या कल्याणकारी योजना झोपड्यांपर्यंत न्या, सामान्यांच्या विरोधात सरकारने निर्णय घेतल्यास त्याविरोधात रस्त्यावर उतरण्याची तयारी ठेवा, असेही ते म्हणाले. शासकीय विश्रामगृहावर जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या प्रमुखांच्या बैठकीत ते बोलत होते.
श्री. मुश्रीफ म्हणाले, ‘‘जिल्हाभर राष्ट्रवादीची सभासद नोंदणी मोठ्या ताकदीने करा. राज्यात स्थापन झालेल्या नव्या सरकारला आमच्या शुभेच्छाच आहेत. लोकशाहीमध्ये विरोधी पक्ष जागृत असला पाहिजे. लोकांच्या प्रश्नांची जाणीव असली पाहिजे. अन्याय होईल तिथे मोर्चा हे आपले लोकशाही मार्गाचे अस्त्र आहेच. भविष्यातील कोल्हापूर महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समित्या, नगरपालिका निवडणुकांसाठी त्यासाठी तालुकानिहाय मेळाव्यांचेही नियोजन करा.’’
श्री. मुश्रीफ म्हणाले, ‘‘नियमितपणे कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदानाचा निर्णय त्रुटी दूर करून घेतलेलाच आहे. नव्या सरकारने निर्णयाची अंमलबजावणी करावी. ग्रामविकास विभागाने एक रुपयात दहा सॅनिटरी नॅपकिन देण्याचा मोठा निर्णयही घेतला होता. त्याचीही अंमलबजावणी सरकार करेल, अशी अपेक्षा आहे.’’
राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांनी प्रास्ताविक केले. माजी आमदार के. पी. पाटील, माजी जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील, प्रदेश उपाध्यक्ष मानसिंगराव गायकवाड, ‘गोकुळ’चे संचालक युवराज पाटील, जिल्हा बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैया माने, रणवीरसिंग गायकवाड, संतोष पाटील, माजी आमदार राजीव आवळे, राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्ष शीतल फराकटे, कार्याध्यक्ष सौ. अस्मिता पवार, शिरोळचे नगराध्यक्ष अमरसिंह माने - पाटील, सरचिटणीस अनिल साळोखे, डॉ. गंगाधर व्हसकोटी आदी उपस्थित होते.

ओबीसी आरक्षण मिळेल
ओबीसी आरक्षण देण्यासाठी आमच्या सरकारने इम्पेरिकल डाटा संकलनाचे काम पूर्णत्वास आणले होते. त्यासंदर्भात १२ जुलैला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होती. तीन किंवा चार तारखेला हा डाटा आयोग सरकारला सादर करणार होता. मध्य प्रदेशच्या धर्तीवर ओबीसी आरक्षण मिळणारच होते. दरम्यान, केंद्रातही भाजप सरकार असल्यामुळे हे आरक्षण मिळेल, असेही ते म्हणाले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y73586 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top